BIG BREAKING NEWS. *शिक्षण आयुक्त मांढरे यांच्या नांदेड दौऱ्यामुळे शिक्षण विभागात प्रचंड घबराटीचे वातावरण*

नांदेड :- (सखाराम कुलकर्णी )नांदेडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या गैरकारभाराचा डंका शासनाच्या व शिक्षण आयुक्तांच्या दरबारी गेल्यामुळे संपूर्ण लेखाजोखा तपासण्यास कर्तव्यदक्ष शिक्षण आयुक्त सुरज मांढरे दोन दिवस २२,२३ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे नांदेडच्या शिक्षण विभागात घबराटीचे वातावरण निर्माण होऊन कागदाला कागद जोडण्यास अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. कोण मांढरेंच्या गळाला अडकेल याची भीती व चर्चा शिक्षण विभागासह विविध संस्थेत होत आहे.
गेली सात -आठ वर्षांपासून नांदेडच्या शिक्षण विभागचा कारभार राज्यात गाजत आहे. त्यात शिक्षणाधिकारी मडावी यांना शिक्षाही झाली. तर शिक्षणाधिकारी सोनटक्के, बाळासाहेब कुंडगीर शासनाच्या हिटलिस्टवर आहेत. शिक्षक भरती बंद असताना बेकायदेशीर शिक्षक भरती,वेतन पथकाने काही बेकायदेशीर वेतन केले, काही शाळेत हजरीपटावर विद्यार्थी संख्या जास्त तर उपस्थिती कमी यातही खूप फरक असून त्या शाळेने शिक्षण विभागाशी संगणमत करून शासनाचे फायदे घेऊन शासनाला फसवल्या चे बरेच तक्रारी वाढल्या आहेत. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांची पुस्तके, विद्यार्थ्यांचे ड्रेस जास्तीचे उचलले जाते अशा विविध तक्रारी शासन दरबारी गेल्या होत्या .नांदेडचा शिक्षण विभाग सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचा निकष शिक्षणाधिकारी काढतात असे दिसते. शिक्षणाधिकारी माध्यमिकचे श्री प्रशांत दिग्रसकर यांनी विनंती वर अकोला येथून २०१७-१८ मध्ये अकोल्याहून नांदेड प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर आले .२०२१ ला त्यांची लातूरला बदली झाली. तर पुन्हा त्यांनी मंत्रालयात संधान साधून नांदेड माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी विनंती वर घेतले .तीच गत शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती सविता बिरगे यांची आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने रंगेहात पकडल्यानंतर व पुन्हा कार्यावर घेतल्यावर त्यांनी परभणीला काही दिवस काढले व त्यांनी मंत्रालयात संधान साधून नांदेड शिक्षण विभाग मागून घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्त झाल्या. तर मागील शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर यांची नांदेडहून दोनदा बदली झाली होती .तरी त्यांनी ती रद्द करून शेवटी मॅट मध्ये जाऊन सेवानिवृत्तीपर्यंत नांदेडलाच राहिले. तर नांदेडच्या शिक्षण विभागात एवढे काय दडले. येथील शिक्षण विभाग कसा चांगला आहे याचे राज्याच्या शिक्षण विभागात बोलल्या जाते. दोन-तीन वर्षापासून नांदेड शिक्षण विभागात गैरकारभार बराच चव्हाट्यावर आला होता. कै. लक्ष्मणराव पाटील हसेकर माध्यमिक विद्यालय लगळूद ता.भोकर शाळेचे मुख्याध्यापक कदम ए .जे . यांना बडतर्फ काळातील सोळा लाखाचे वेतन दिल्याचे प्रकरण, तसेच याच शाळेतील श्रीमती चव्हाण मॅडम यांना 30 लाखाचे दिलेले वेतन, झाकीर हुसेन उर्दू शाळा मुखेड ही शाळा बंद झाली तरी पाच शिक्षकांना दिलेले वेतन, आनंदीबाई शाळेच्या बेकायदेशीर झालेल्या नियुक्ती व त्या शिक्षकांचे वेतन करणे, व हे वेतन मंजूर करून काही दिवस अधिकाऱ्यांनी वैयक्तिक स्वतःच्या खात्यात ठेवल्याचे प्रकरण, नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता.मुखेड नरसिंह विद्यामंदिर नांदेड शाळेतील गैरनियुक्त्या, विद्यार्थी संख्या कमी, अधिकृत कार्यकारणी नसताना मुख्याध्यापकांना मान्यता देऊन शासनाला गंडवणे असे बरीच प्रकरणे गाजण्याची शक्यता आहे. शिक्षण आयुक्त मांढरे यांना नांदेडचा शिक्षण विभाग धुऊन काढण्यास आठ दिवसही कमी पडतील अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे. मात्र या दोनच दिवसात त्यांच्या दौऱ्यामुळे शिपायापासून शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत सर्व घाबरून गेले असून कागदपत्राची जमवाजमव करण्यास युद्ध पातळीवर कामाला लागलेले आहेत. कारण बरीच शिक्षक मान्यतेची प्रस्ताव गायब झाली असून त्यांची ही प्रकरण गाजण्याची शक्यता आहे.



