हेल्मेट नाही तर प्रवेश नाही* नांदेड आरटीओ ने असे बंधन घालून वाहनधारकात आणली जागृतता……!

नांदेड:- (सखाराम कुलकर्णी ) दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट घालावे तर कारचालकांनी सीट बेल्ट लावावा हा नियम शक्तीचा असला तरी दुचाकी वाहनधारक हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना हेल्मेट वापरण्याची सवय लागावी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट नाहीतर कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाही असा नियम घालून नागरिकात जनजागृती निर्माण करण्यास सुरुवात केली. वाहनधारकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरावे तर कारचालकांनी सीट बेल्ट लावावा हा नियम काही वर्षांपूर्वी सक्तीचा केला आहे .यावर काही नागरिक न्यायालयात गेले होते ,आंदोलन केली होती तर न्यायालयाने पण हेल्मेट वापरणे बंधनकारक व सक्तीचे केले .तरी राज्यात मुंबई शहर वगळता कोठेच हेल्मेट वापरल्या जात नाही .पण हेल्मेट वापरणे वाहनधारकाच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी आहे व याची जनजागृती व्हावी या उद्देशाने नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालया चे अधिकारी शैलेश कुमार कामत यांनी हेल्मेट घालने बंधनकारक केले असून हेल्मेट घातले नसेल तर कार्यालयाच्या आवारात दुचाकी स्वारास प्रवेश बंद केला.
हा नियम आधी आपल्या कार्यालयापासून सुरू करून पुढे काही दिवसांनी इतर सर्व शासकीय कार्यालयात बंधनकारक करून विना हेल्मेट कार्यालयाच्या आवारात प्रवेश बंदी करण्याचा मानस असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी सांगितले. वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्तीची जनजागृती अशा प्रकारे केली व असे नियम इतरही सर्व कार्यालयाने सुरू करावे.वाहनधारकांना कार्यालयात येताना हेल्मेट सक्ती केली की त्यांना नियमित हेल्मेट वापरण्याची सवय लागून जाईल व त्यांचेच जीवन सुरक्षित राहील. बऱ्याच वेळेला दुचाकीवर अपघात झालेल्या घटना घडलेल्या आहेत. त्यांनी हेल्मेट न वापरल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यात त्यांचा मृत्यू झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यासाठी अशा घटना घडू नयेत म्हणून हेल्मेट वापरणे आवश्यक आहे व यासाठीच जनजागृती करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. असे अविनाश राऊत यांनी सांगितले.हा नांदेडचा पॅटर्न इतर जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाने राबवून हेल्मेटची जनजागृती करणे आवश्यक आहे.



