महाडीजीटल मिडीया असोसिएशन संस्थापक अध्यक्ष ऍड.अद्वैत चव्हाण यांचे आय.टी.कायदा पदव्युत्तर अभ्यासक्रमात घवघवीत यश…….!

मुंबई:-महा डीजीटल मिडीया असोसिएशन संस्थापक अध्यक्ष ऍड .अद्वैत प्र.चव्हाण यांनी आय.टी.कायदा पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पुर्ण केला. त्या बद्दल त्यांचे MDMA सर्व सदस्य व पदाधिकारी तथा सर्व डीजीटल मिडीया चे न्यूज पोर्टल चे संपादक व उपसंपादक-आणि पत्रकारांनाकडुन मनपुर्वक अभिनंदन करण्यात येत असून या मुळे डीजीटल क्षेत्रात सर्वांचे बळ व उर्जा नक्कीच वाढवणार यात तिळ मात्र शंका नाही अशी भावना डिजिटल मिडिया पत्रकारांमध्ये व्यक्त केली जात आहे.
अद्वैत चव्हाण यांनी वकीलपत्र या वेब पोर्टलची निर्मिती प्रामुख्याने कायदा संदर्भातील माहिती मराठी भाषेमध्ये नागरिकांकरिता तसेच कायद्याच्या विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध करून देणे या करिता केलेली आहे. याच बरोबर कायदेशीर मदत मिळवून देणे या साठी सुद्धा वकील पत्र कार्यरत आहे.
कायदा अभ्यास क्रमाला प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून प्रवेश घेण्यापासून ते अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी तसेच इतर सर्व बाबी बद्दलचे परिपूर्ण मार्गदर्शन वकीलपत्र या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध आहे.
वकील पत्र या पोर्टलच्या माध्यमातून लोकांमध्ये कायद्या बाबत जनजागृती करणे तसेच जे कायदे दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या कायद्याबद्दल मातृभाषेतून माहिती पुरवणे त्यांचे वकीलपत्र पोर्टल व यूट्यूब चैनल चा मुख्य उद्देश आहे.
त्यांच्या यशाबद्दल AR NEWS नेटवर्कचे संपादक आणि MDMA महा डीजिटल मिडिया सोलापूर शहर अध्यक्ष संमोहन तज्ञ डॉ रविंद्र सोरटे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



