आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकारांचे राज्यव्यापी  आंदोलन यशस्वी सोलापूरातही पत्रकार संरक्षण कायदयाची करण्यात आली होळी …..!

Spread the love

सोलापूर : पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या अनेक प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकारांनी प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात आली .याच अनुषंगाने सोलापूरात ही पूनम गेट सोलापूर येथे सकाळी ११ वाजता पत्रकार संरक्षण कायदया ची होळी करण्यात आली व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांवे सादर केलेले निवेदन सोलापूर चे उप जिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले .या आदोलनात शहर व जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटना , वृत्त पत्रकार, छाया चित्रकार , इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे सर्व पत्रकारांनी उपस्थित राहून हा लढा यशस्वी केला .

या आंदोलनात,सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अय्यूब नल्लामंदू , सचिव प्रा पी पी . कुलकर्णी , पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती .सोलापूर जिल्हा निमंत्रक समितीचे भगवान परळीकर, सोलापूर संपादक संघ चे विश्वनाथ व्हनकोरे, अधिस्विकृती पत्रकार संघाचे श्रीशैल चिंचोळकर , वंदे मातरम पत्रकार संघाचे योगेश तुरेराव , श्रमिक पत्रकार संघाचे दशरथ वडतिले , विजय कुमार जुंजा’ , बाळा साहेब वाघमोडे , तेलंग , बहुभाषिक वृतपत्र संघाचे मजहर अल्लोळी , इक्बाल बागबान , सुलतान अख्तर,परशुराम कोकणे, विनायक होटकर, प्रेस फोटोग्राफर नागेश दंतकाळे, लोक प्रधान चे इम्रान सगरी , एनडी चे सलाउद्दीन शेख, वैभव गांगणे , मुन्ना शेख, योगेश कल्यणकर, आदम मुन्शी , नारायण दत्तात्रय घंटे, जहुर सय्यद , अकबर बागबान इ. पत्रकार उपस्थित होते

सह सर्व पत्रकार संघाचे प्रमुख उपस्थित होते
प्रा पी पी कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले भगवान परळीकर, दशरथ वडतिले यांनी मार्गदर्शन केले , शेवटी अय्युब नल्लामंदू यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!