माहितीचा अधिकार हा शासकीय यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आहे. -राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी.

औरंगाबाद- (विशेष प्रतिनिधी )-माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची राज्य स्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली.या वेळी राज्यातील विभाग व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र व ओळख पत्र देण्यात आले. यावेळी माहितीचा अधिकाराचे महत्व काय हे कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी व समितीचे कार्य काय आहे याचे मार्गदर्शन अध्यक्ष महेश सारणिकर यांनी केले.

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची स्थापना होऊन एक वर्ष झाले. समितीचे संस्थापक व अध्यक्ष महेश सारणिकर यांनी राज्यभर समितीचे जाळे पसरवले. व जिल्ह्या जिल्ह्यात कार्यकारिणी स्थापन केली. या कार्यकारिणीच्या विभागीय स्तरावरील कार्यकारिणीला व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना त्यांचे नियुक्ती पत्र व ओळख पत्राचे वाटप करण्यास राज्य स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही राज्य स्तरीय बैठक सर्वाच्या सोईनुसार सुभेदारी गेस्ट हाऊस छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष महेश सारणिकर, कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, संपर्कप्रमुख विकास गोरडवार सह आदींची उपस्थिती होती. या वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे महत्व सांगताना ते म्हणाले हा कायदा १२ ऑक्टोबर २००५ मध्ये सुरू झाला. या कायद्याचा मुख्य उद्देश शासकीय यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे हा आहे. पण नंतर काही माहिती अधिकार कार्यकर्ते या कायद्याचा गैर वापर करून कार्यकर्तेच भ्रष्टाचार युक्त झाल्याची ओरड सुरू झाली. तर आपल्या प्रतिनिधीने भ्रष्टाचार युक्त न होता शासकीय यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त करा असे आवाहन सखाराम कुलकर्णी यांनी केले आहे .समितीचे अध्यक्ष महेश सारणिकर यांनी समितीचे अधिकार, कर्तव्य व उद्देश सांगितले. व तुम्ही कार्य केले तर समिती, समिती आहे तर मी अध्यक्ष. असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगून पुढे म्हणाले तुम्ही पण समितीचे जाळे राज्यभर निर्माण करण्यास हातभार लावू शकता. लवकरच महिला आघाडीची कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर समितीचे
उपाध्यक्ष विनोद गायकवाड, संपर्कप्रमुख विकास गोरडवार यांनी ही मार्गदर्शन केले. याच बैठकीत विनोद गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन समितीने त्यांना सचिव म्हणुन पदोन्नती दिली. या बैठकीमुळे सर्व पदाधिकाऱ्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.



