आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दौंड येथे झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तीन व्यक्तीना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत….!

Spread the love

अक्कलकोट:-(प्रतिनिधी राजशेखर पवार)
१ फेब्रुवारी २०२३ रोजी दौंड येथे झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तीन व्यक्ती मयत झालेल्या होत्या.


या अपघातामध्ये तालुक्यातील आरती अंबाना बिराजदार (चपळगांव), गणपती मल्लाप्पा पाटील (सलगर), अमर महांतेश कलशेट्टी (गोगाव) हे मयत झाले होते.सदरचा अपघात हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुल्याजवळ झाला होता.त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आरती अंबाना बिराजदार (चपळगांव), गणपती मल्लाप्पा पाटील (सलगर), अमर महांतेश कलशेट्टी (गोगाव) यांच्या वारसांना  मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख एवढी मदत मिळालेली आहे. त्याचे चेक वितरण शनिवारी अक्कलकोटचे आमदार  सचिन कल्याणशेट्टी, तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मृताचे वारसादार अंबरनाथ शरणाप्पा बिराजदार( चपळगाव), संजय कुमार गणपती पाटील (सलगर), गोगाव महांतेश बसवणप्पा कलशेट्टी (गोगाव)यांना मदत निधी देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!