आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२७ जुलै नामांतर दिनी सोलापूरात फुले-शाहू-आंबेडकरी कार्यकर्त्यांचा जागर मेळावा

Spread the love

सोलापूर – दलित पँथर सुवर्ण महोत्सव समारोह समितीच्या वतीने दि. २७ जुलै २०२३ रोजी दुपारी ४.०० वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे फुले-शाहू- आंबेडकरी कार्यकर्त्यांचा जागर मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीचे प्रमुख संयोजक डॉ. किर्तीपाल गायकवाड व निमंत्रक बाबूराव बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या फुले शाहू आंबेडकर कार्यकर्त्यांचा जागर मेळाव्यास उद्घाटक म्हणून छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज शिवश्री फतेहसिंहराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत दलित पॅंथरचे सोलापूरचे माजी अध्यक्ष विद्रोहीकार अंबादास शिंदे हे मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून पँथरचे नेते अॅड. किर्तीभाई ढोले व ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते महादू पवार व युवा पँथर नेते अपरांत अरूण कांबळे (मुंबई) ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यातफुले-शाहू – आंबेडकरी चळवळीत ज्यांनी योगदान दिले आहे अशा कार्यकर्त्यांचा ‘डॉ. आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या मेळाव्यात पँथरच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त विशेषांकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे कार्याध्यक्ष पँथर जनार्दन शिंदे, राजाभाऊ सोनकांबळे, कुमार चन्ना व नागेश बंगाळे विशेष प्रयत्न करीत आहेत.
या पत्रकार परिषदेतस मेळाव्याचे अध्यक्ष पँथर अंबादास शिंदे, कार्याध्यक्ष जनार्दन शिंदे, राजा सोनकांबळे, कुमार चन्ना, फारूख शेख, अक्षय बबलाद, चांगदेव सोनवणे, आर. के. कांबळे, भालचंद्र साखरे, कल्याण श्रावस्ती, प्रदिप कांबळे व विश्वास गायकवाड हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!