*लाचलुचपत विभागाकडे चौकशी गेलेल्या त्या ३६ शिक्षणाधिकाऱ्यात नांदेडचे शिक्षणाधिकारी आहेत का? चर्चेला उधाण*

नांदेड (सखाराम कुलकर्णी) राज्यात शिक्षण क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर गैरकारभार, भ्रष्टाचार वाढला आहे ही बाब कर्तव्यदक्ष व जागरूक शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे ३६ शिक्षणाधिकाऱ्यांची नावे देऊन यांची उघड तपासणी करण्याची मागणी केली. या मागणीमुळे नांदेडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची पण नाव आहेत का या चर्चेला उधाण येऊन शिक्षण विभागात उलट सुलट चर्चा होत आहे .शिक्षण क्षेत्रात प्रचंड गैर कारभार वाढला हे सांगण्याची आवश्यकता नसून शिक्षण संचालकांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे काही शिक्षणाधिकारी मनमानी करून वाटेल तशा शिक्षकांना नियुक्त्या देऊन गैरकाम करतात .हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे. बऱ्याच जागरूक नागरिकांनी याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक पुणे तसेच शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे अशा शिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या आहेत .पण शिक्षण संचालक या तक्रारीकडे लक्ष देत नसून तक्रारदाराला स्पष्ट सांगतात आम्हाला या तक्रारीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्ही शिक्षण उपसंचालक यांच्याकडेच जावे .हा प्रकार शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात येतो. व आपल्या तक्रारी कितीही झाल्या तरी शिक्षण संचालक आपले काहीही वाकडे अथवा नुकसान करत नाहीत .असं म्हणून शिक्षणाधिकारी प्रचंड गैरकारभार व भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. सन २०१२ नंतर शिक्षक भरतीवर बंदी असतानाही बरेच शिक्षणाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पर्यायाने,वेगळे पर्याय उपलब्ध करून लाखो रुपयांवर शिक्षक भरती केलेली बरीच प्रकरण ऊजेडात आली आहेत. बऱ्याच शिक्षकांना मागील नेमणूक दाखवून त्यांचे लाखोंची थकीत बिले कोणाच्याही परवानगी विना अदा केलेली आहेत. अशाही तक्रारी वाढल्या आहेत. नांदेडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैर कारभाराची, भ्रष्टाचाराची तक्रार जागरूक पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिनांक दि.१८-११-२०२२ ला केलेली आहे. या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशीचे करण्याचे पत्र मंत्रालयातून शिक्षण आयुक्त पुणे यांचेकडे २९ डिसेंबर २०२२ ला आले. त्यांनी याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षक संचालकांना दिलेत. पण शिक्षण संचालकांनी अद्याप याबाबत कोणतीही चौकशी केली नाही. शिक्षण संचालकांच्या अशा दिरंगाई कामामुळे शिक्षणाधिकाऱ्यात गैरकारभार व भ्रष्ट कारभार करण्याची हिम्मत वाढत असून असे गैर प्रकार वाढत आहेत. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे शिक्षण आयुक्तपदी आल्यावर ते कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच तक्रारी गेल्या. त्यांनी या सर्व तक्रारीचे व गैर कारभाराच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची प्रकरणात लक्ष देऊन त्यांनी आता याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊन ३६ शिक्षणाधिकाऱ्यांची नावे दिली. व यांची उघड चौकशी करावी अशी मागणी केली आहे .त्यात आयुक्तांनी हेही स्पष्ट केले की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकल्यावरही पुन्हा ते अधिकारी नोकरीवर येतात व पुन्हा गैरकारभार करतात अशा स्पष्टीकरणामुळे नांदेडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता बिरगे यांना नांदेडला शिक्षणाधिकारी पदाच्या कर्तव्यावर असताना तीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते व पुन्हा त्या नोकरीवर दाखल होऊन नांदेडलाच शिक्षणाधिकारी म्हणुन पदस्थापनेवर आहेत. तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचे वरही नांदेड जिल्ह्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. तसेच शिक्षकांच्या गैर नियुक्त्या काही शिक्षकांची थकीत बिले काढल्याच्या बऱ्याच तक्रारी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे व शिक्षण मंत्र्यांपर्यंत गेलेल्या आहेत. यामुळे त्या ३६ शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावामध्ये या दोघांचे नाव आहे का अशी चर्चा शिक्षण विभागात व तक्रारदारात होत आहे. तसेच दोन्ही प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यात पण आपले नाव आहे की काय असे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.



