आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींची जामीनावर मुक्तता*…… ऍड. राजकुमार बाबरे 

Spread the love

सोलापूर : यातील फिर्यादी यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी बजरंग शिवाजी गायकवाड याची मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर . भोला यांनी जामीनावर मुक्तता केलेली आहे. यात हाकिकत की मागील पाच ते सहा महिन्यापासून बजरंग हा दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरासमोरून जाताना फिर्यादी यांना वाईट नजरेने एकटक पाहत होता. परंतु सदर बाब फिर्यादी यांनी कोणासही सांगितली नव्हती, त्यानंतर फिर्यादी यांच्या गल्लीतील ओळखीच्या इतर महिलांवर सुद्धा आरोपीने अश्लील व लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने फिर्यादी यांनी वरील आरोपी बजरंग शिवाजी गायकवाड याच्यावर जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 354, 354(D) 452, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींला अटक करून मेहरबान कोर्टात हजर केले असता मेहरबान कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवले. त्यामुळे यातील आरोपींच्या वकिलांनी मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात जमिनीचा अर्ज दाखल केलेला होता .युक्तीवादामध्ये आरोपीच्या वकिलांनी भादवे कलम 354 व 452 हे सदर गुन्ह्यात लागू होत नाही तसेच केवळ आणि केवळ राजकीय कारणातून आरोपींना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आहे, असे युक्तिवादामध्ये सांगितले तेव्हा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला. या खटल्यात आरोपीतर्फे एडवोकेट राजकुमार बाबरे, सरकार पक्षातर्फे बनसोडे मॅडम तर मूळ फिर्यादीतर्फे एडवोकेट विनीत कुमार गायकवाड यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!