आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर येथे तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे यांचा श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने सत्कार….!

Spread the love

पंढरपूर:- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तेज न्यूज चे संपादक व पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांचा सत्कार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुकमिणी समितीची दैनंदिनी,श्री चे उपरणे,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी सुधीर घोडके, कोकीळ व मंदिर समितीचे कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, तेज न्यूज च्या माध्यमातून पंढरपूर व परिसरातील घडामोडींची तात्काळ माहिती समजली जाते. त्यामुळे परिसरातील घडामोडी लगेच समजतात. या पुढील वाटचाली करिता व तेज न्यूज परिवाराची प्रगती होत राहो हिच मंदिर समितीच्या वतीने पांडुरंग चरणी प्रार्थना व्यक्त करतो.

यावेळी माळवदे म्हणाले, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीच्या वतीने सदस्य संभाजी राजे शिंदे यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या . त्याबद्दल मंदिर समितीचे खूप खूप आभारी आहे. या पुढील काळातही माझ्याकडून अधिक चांगल्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातील.अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!