*खाल्ल्या मिठाशी गद्दारी करणारे आमदार शहाजी बापू – प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी*

सोलापूर:- काल सांगोल्यात बोलताना शहाजी बापू पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी असे म्हणाले की आमदार शहाजी बापू पाटील हे खाल्ल्या मिठाला न जागणारे आहेत ज्या शिवसेनेने आमदार केलं त्याच्यावर टीका करतात ज्या काँग्रेसने आमदार केलं व अनेक वेळा आमदारकीची तिकिट दिली त्यांच्यावर ते टीका करतात एकीकडे पवार साहेबांना गुरु म्हणतात त्यांच्यावर टीका करतात हे खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. उद्या सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करायला ते कमी करणार नाहीत त्यामुळे पूर्वीपासूनच शहाजी बापू पाटील हे ज्याचं मीठ खातात त्याच्याशी गद्दारी करतात नाना पटोले हे पद प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते आजपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं आहे विधान परिषदेच्या पाच निवडणुका व कसब्याची ची पोटनिवडणूक ज्या पद्धतीने काँग्रेसचा विजय झाला त्याचे सगळे श्रेय नाना पटोले यांना जाते अशा विकासपुरुष माणसावर टीका करावी म्हणजे सूर्यावर थूकण्या सारखे आहे त्यामुळे शहाजी बापूंनी आपल्या मर्यादा ओळखाव्यात अन्यथा काँग्रेसचा कार्यकर्ता जशास तसे उत्तर देण्यास काँग्रेस कार्यकर्ता सज्ज आहे.असा इशाराही काका कुलकर्णी यांनी दिला आहे.



