काँग्रेस सरचिटणीस श्रीशैल दादा रणधिरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व निदान शिबिर संपन्न….!

सोलापूर :-मानवता विकास मंडळ संचालित व लायन्स क्लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष आयु. श्रीशैल दादा रणधिरे सर, सरचिटणीस, काँग्रेस कमिटी सोलापूर, यांच्या १३ मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बंटी चंदनशिवे, प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष मसाजी मामा गोतसूर्वे, खजिनदार भीमराव मामा गोतसुर्वे, सचिन चौधरी सर,उपसंपादक सोमनाथ गायकवाड, मुकुंद गायकवाड, दिलीप वाघे,आप्पाशा गायकवाड, प्रभाकर गायकवाड, रमाकांत सर्वगोड, संतोष सोनवणे,व वाढदिवसाच्या सत्कारमूर्ती श्याम भैया कदम, अध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड शहर व संजीवकुमार कलशेट्टी सर,सौ.सिंधुताई सुरवसे ऑफतोमॅटी यांच्या हस्ते बुद्धवासी दलितमित्र नागनाथ रणधिरे सर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नेत्ररोग तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली

त्यानंतर संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम भैय्या कदम यांच्या व संजीव कुमार कलशेट्टी सर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीशैल दादा रणधिरे सर यांच्या हस्ते फेटा शाल पुष्पहार देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
*शाम भैय्या कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “श्रीशैल दादा रणधिरे,शैक्षणिक, सामजिक, सांस्कृतिक कार्यात सामान्य लोकांसाठी नेहमीच कार्यरत असतात.*
कार्यक्रमासाठी दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक महानिंग यलगोंडे सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया रणधिरे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब छोटे सर यांनी केले व आभार प्रदर्शन सूर्यकांत कणमुसे सर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे वार्तांकन संजीव कुमार कलशेट्टी यांनी केले.



