*पुणे शहरातील अनाधिकृत होर्डींगवर कडक कारवाई करणार*-उपायुक्त माधव जगताप

पुणे-(सखाराम कुलकर्णी)- पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृत व स्ट्रक्चर नसलेले होर्डींग मुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे असा अनाधिकृत होर्डींगधारकांवर या पुढे कडक कारवाई करण्यात येईल असे पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त माधव जगताप यांनी सांगितले .
विविध उत्सव, वाढदिवस ,स्वागत, असा वेग वेगळ्या शुभेच्छा च्या बॅनर, होर्डींग मुळे पुणे शहराला विद्रूपपणा येऊन नागरिकांचे जिवाला पण धोकादायक आहे. असा अनाधिकृत बॅनर मुळे पुणे शहरात ६ जणांचे प्राण गेले. नागरिकांची जिवितहानी होऊ नये म्हणून महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांना कठोर कारवाई करण्यास भाग पडावे लागत आहे असे सांगितले. जगताप यांनी आतापर्यंत ५०८ Advanced गुन्हे दाखल केले. व ४९३ होर्डींग धारकांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना पत्र दिले. तसेच यांचेकडून आतापर्यंत ७४,९७,६०० रुपयाचा दंड वसूल केला. पुणे महापालिका हद्दीत अनाधिकृत २६२९ तर अधिकृत २४८५ होर्डींग आहेत. ९५३ अनाधिकृत काढण्यात आली. व अजूनही काढण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी विशेष दहा पथक तयार केलीत. रेल्वे स्थानक बाहेर, रेल्वे विभागाचे व एस.टी. महामंडळाचे पण अनाधिकृत होर्डींग आहेत त्यांना ते काढण्याचे किंवा कर भरण्याचे पत्र देण्यात येणार. वास्तविक एखाद्या होर्डींग मुळे जिवितहानी झाली तर त्याची जिम्मेदारी होर्डींग धारकावर असते व तसे प्रतिज्ञापत्र करून घेण्यात येणार. अनाधिकृत होर्डींग च्या कारवाई साठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य नसते. अशी खंत उपायुक्त जगताप यांनी व्यक्त केली. वास्तविक कारवाई करताना पोलिसांचे पथक सोबत पाहिजे व आम्ही पत्र दिले की ताबडतोब गुन्हे दाखल केले पाहिजे. पण असे होत नाही. पण आता महापालिका अनाधिकृत होर्डींग कठोर भूमिका घेऊन कारवाई केली जाईल असे जगताप म्हणाले. अनाधिकृत होर्डींगवर कठोर कारवाई करण्याचा पुणे पॅटर्न पूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवण्याची आज गरज आहे.



