आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे /पालघर जिल्हा समन्वयक पदी* अरुण ठोंबरे यांची नियुक्ती*

Spread the love

सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत परंतु

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचे अनेक प्रश्न राज्यसरकार कडे प्रलंबित असून या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत आहे पत्रकार सुरक्षा समिती ठाणे /पालघर जिल्हा समन्वयक पदी दैनिक श्री साम्राज्य चे जेष्ठ संपादक अभ्यासू पत्रकार अरुण ठोंबरे यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केली असून पत्रकारिता व पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नाची अरुण ठोंबरे यांना जाणीव असून त्यांचे संघटन कौशल्य खूप मोठे असून आहे अरुण ठोंबरे यांनी यापूर्वी पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून अनेक निवेदन व राज्य सरकार कडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून अरुण ठोंबरे हे दैनिक साम्राज्य वृतपत्राचे संपादक असून सर्व पत्रकाराना सोबत घेऊन काम करत असून पत्रकाराच्या प्रश्नाबाबत त्यांची नेहमीच तळमळ राहिली आहे त्यांच्या निवडीने ठाणे / पालघर जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून ठाणे /पालघर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील अशी अपेक्षा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
*पत्रकारांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवू* अरुण ठोंबरे
आपण यापूर्वी पत्रकार सुरक्षा समिती चे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून त्या काळात पत्रकार सुरक्षा समिती वतीने अनेक पत्रकारांचे प्रश्न सोडवले असून पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका बजावली असून यापुढे देखील ठाणे / पालघर जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न आपण पोटतिडकीने व प्रामाणिक पणे नक्कीच सोडवणार असल्याचे नूतन ठाणे / पालघर जिल्हा समन्व्यक तथा दैनिक साम्राज्य संपादक अरुण ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!