आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*शासनाकडून समाजभूषण पुरस्कारार्थिंना न्याय मिळवून देईन— सि.एल.थुल,माजी अध्यक्ष मानवाधिकार आयोग महा.राज्य.

Spread the love

हिंगोली-( सखाराम कुलकर्णी वृत्त विशेष )–, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी च्या बाबत अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी विद्यमान शासनकर्त्यांचे लक्षवेध करेल अशी ग्वाही मानवअधिकार आयोग महाराष्ट्र राज्य व अनुसूचित जाती जमाती आयोगा चे माजी अध्यक्ष सी.एल.थूल ह्यांनी दिली.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हिंगोलीच्या वतीने सामाजिक न्याय समता पर्वाच्या अनुषंगाने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील डी पी डी सी सभागृहात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदे विषयक कार्यशाळा आणि संविधान जनजागृती कार्यक्रमास प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून माजी न्यायाधीश सी.एल.थूल उपस्थित होते.ह्या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर,अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिंनगिरे आदी सह जिल्हा प्रशासन पोलिस प्रशासन आणि संबंधित उपस्थित होते.सी एल थूल आदींनी जवळपास २तास उपस्थितांना मार्गदर्शन केले व संविधान जनजागरण ही केले. सी.एल.थूल ह्याना महाराष्ट्र राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र संघाचे राज्य कार्याध्यक्ष समाजभूषण डॉ.विजय निलावार ह्यांनी निवेदन देवून मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्री महोदयांना सदरील निवेदन देण्यासाठी सुपूर्द केलं. राज्य शासनाकडून गोरोंवित झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारारार्थीना एस.टी.प्रवास सवलतीत,आणि अन्य बाबतीतही अन्याय होत असल्याचं संघाच्या निवेदनात नमूद केल्याचं डॉ. निलावार यांनी स्पष्ट केलं.मागील वीस वर्षात तत्कालीन शासन शासनकर्त्यानी दलितमित्र व समाजभूषण पुरस्कारार्थिना स्वतंत्रसेनानी प्रमाणे मानधन देण्यात येईल असे राज्यातील अनेक ठिकाणच्या जाहीर कार्यक्रमात जाहीर केले पण अमलबजावणी केली नाही, ती करावी,पूर्वी सर्व बसेस मधून एका साथीदारासह राज्यातील एस टी जिथवर राज्याच्या बाहेर जाते तिथवर प्रवास सवलत वीना किलोमिटर अटी ने होती त्या बाबत अन्याय झाला असून किलोमिटर ची अट घालून सर्व प्रकारच्या बसेस मधून प्रवास सवलत दिल्या जात नाही ती द्यावी,महात्मा फुले जनारोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेचा लाभ समाजभूषण पुरस्कारार्थी आणि कुटुंबीयांना तहाय्यात द्यावा,एस टी प्रमाणे रैलवे प्रवास सवलत मिळवून द्यावी,शासनाच्या विविध योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थी पर्यंत पोचवण्यासाठी राज्य ते तालुका स्तरावर पर्यंत. असलेल्या विविध विभागाच्या समित्यांवर पुरस्कारार्थिना अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करावे,समाजभूषण पुरस्कारार्थिणा एकंदरीत स्वातंत्र्यसेनानी प्रमाणे सर्व सुविधा द्याव्यात अश्या मागण्यान्चे महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे संघाचे राज्य कार्याध्यक्ष समाजभूषण डॉ. निलावार ह्यांनी दिले.विशेष म्हणजे न्यायधिश सी एल थूल हे महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोग व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष असून शासनाने त्यांच्या कार्यगौरवार्थ त्यांचा डॉ.बाबासाहेब समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित केलं आहे.याप्रसंगी थूल ह्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!