तळेगाव दाभाडे येथे हिंदू जनगर्जना मोर्चाला लोटला जनसागर.
तळेगाव दाभाडे येथे मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चा आज काढण्यात आला. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन धर्मवीर दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तळेगाव दाभाडे येथे हिंदू जनगर्जना मोर्चाला लोटला जनसागर.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १२ फेब्रुवारी.

तळेगाव दाभाडे येथे मावळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनगर्जना मोर्चा आज काढण्यात आला. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन धर्मवीर दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
भारतभूच्या सुपुत्रांनो जागे व्हा. शिवप्रभुंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य व रामराज्य निर्माण करण्यासाठी सक्रिय व्हा… देव, देश, धर्म, संत, गोमाता आणि माता-भगिनी यांच्या रक्षणासाठी या भूमंडळाचे ठायी प्रचंड क्रांती घडवून, हिंदू समाजाची संघटित शक्ती उभी करावी लागणार आहे कारण हिंदवी स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीतच हिंदूंची सुरक्षा आज धोक्यात आली आहे. समाजकंटकांना, गुन्हेगारांना अशा कारवाया करण्याची हिम्मत होते कारण हिंदू आज आत्मकेंद्रित आणि असंघटित आहे. दुष्ट शक्तींना वचक, धाक बसेल असा हिंदूंच्या संघटित शक्तीचा प्रभाव, दबाव निर्माण करणे हेच या समस्येवरचे उत्तर आहे. हिंदू समाजाच्या संघटित शक्तीच्या दर्शनाने समाजात विश्वास व दुष्ट शक्तींना धाक निर्माण होण्यासाठी हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन केले होते या जनगर्जना मोर्चात सर्व हिंदू बंधू-भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हिंदू समाजाच्या विराट शक्तीचे दर्शन घडविले आणि शिवरायांची ही भूमी पुन्हा एकदा देव, धर्म, माता-भगिनी आणि गोमाता यांच्यासाठी सुरक्षित बनविण्याच्या या धर्मकार्यात सिंहाचा वाटा उचलला.

मोर्चात राम कृष्ण हरी… जय श्रीराम…हर हर महादेव…पवनपुत्र हनुमान की जय… जय भवानी, जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय… भारत माता की जय… असा जयघोष करण्यात येत होता. नागरिक हातात भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता. लहान मुले, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
हिंदू जनगर्जना मोर्चाला लोटला जनसागर. पाहुयात व्हिडिओ.