ताज्या घडामोडी

पुणे कॉप्स संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love

पुणे कॉप्स संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी,१३ फेब्रुवारी.

केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन, कॉप्स या सामाजिक संस्थेच्या नवीन वास्तूमधील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे आमदार पिंपरी विधानसभा व बिना इंग्लिश मेडियम स्कूलचे अध्यक्ष इक्बाल खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉप्स संस्थेचे अध्यक्ष आदम बेग,संचालिका रुपाली बेग ,कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अमर एकाड , ह्युमन राईटसचे विकास कुचेकर,ॲड. आयुब पठाण, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे , प्रा. डॉ. साजीद शेख व संस्थेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

 

कॉप्स या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी अमर एकाड उपाध्यक्ष पदी प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, रायगड जिल्हा अध्यक्ष पदी प्रा. डॉ. साजीद शेख यांची नियुक्ती कॉप्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदम बेग व संचालिका रुपाली बेग यांच्या हस्ते करण्यात आली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!