ताज्या घडामोडी

हिंद विजय सहकार पुरस्कार जाहीर..

हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षी हिंद विजय पतसंस्थेने सर्व पतसंस्थेचे अहवाल मागवून व सर्वे करून हिंदविजय सहकार पुरस्कार जाहीर केला.

Spread the love

हिंद विजय सहकार पुरस्कार जाहीर. :-हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षी हिंद विजय पतसंस्थेने सर्व पतसंस्थेचे अहवाल मागवून व सर्वे करून हिंदविजय सहकार पुरस्कार जाहीर केला.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर, १२ फेब्रुवारी.

 

यामध्ये धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था व भरत अग्रवाल नागरी सहकारी पतसंस्थेचा हिंद विजय सहकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हा गौरव पतसंस्थेच्या स्वच्छ कारभार व कमी N P A साठी देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी दत्ताभाऊ भेगडे (उपाध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक) प्रमुख पाहुणे गुलाबराव वाघोले (उपाध्यक्ष जय हिंद सहकारी बँक) व ॲड रवींद्र दाभाडे सुधाकर देशमुख होते यावेळी डॉ प्रमोद बोराडे यांनी अपरिचित मावळ या विषयावर सुंदर असे व्याख्यान दिले.

प्रास्ताविक कैलास भेगडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप गटे यांनी केले यावेळी पुरस्कार दिल्याबद्दल विजय शेटे यांनी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे आभार मानले याप्रसंगी लता भरत अग्रवाल सुनंदा दत्तात्रय दाबणे संजय गायकवाड राजू दळवी रामविलास खंडेलवाल, मिलिंद खळतकर,यशवंत पायगुडे,अरविंद कुलकर्णी, सुरेश गायकवाड, ऋषिकेश लेंडघर, खंडूजी टकले, विजय शेटे विनोद टकले, संतोष परदेशी, ॲड तुकाराम काटे,संजय शिंदे, अमर खळदे, मयूर वाघोले, मयूर पिंगळे, आदित्य टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!