ताज्या घडामोडी

विकसित व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग तो म्हणजे–आज आपण आपल्यात असलेल्या अंतर व्यक्तिमत्त्वाविषयी विचार.

Spread the love

विकसित व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग तो म्हणजे–आज आपण आपल्यात असलेल्या अंतर व्यक्तिमत्त्वाविषयी विचार.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विशेष लेख.१६ जानेवारी.

नेहमी अंतर्मनातील भावनांचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर नेहमी सतत उमटत असतं ! परमेश्वराने दिलेली उत्तम तेरी व्यक्ती कितीही चांगली असली तरी जर– आपलं अंतर्मन धास्तावलेले असेल – दुःखी आणि तणावग्रस्त असेल तर अशी व्यक्ती कधीच आनंदी दिसू शकत नाही! कारण तिच्या चेहऱ्यावर असलेली उदासीनता नैराश्य आणि त्यामुळे चेहऱ्यावर प्रतिबिंबित होणारे चिंतेचे भाव आपल्याला सहज टिपता येतात.

म्हणूनच आपलं मन नेहमी शांत प्रसन्न स्वस्थ आनंददायी आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला असेल तर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे प्रतिबिंब निश्चितच वातावरणात त्यांच्या सहवासाने एक प्रकारचा उत्साह निर्माण करणारे ठरते यात शंका नाही*!आणि अशी व्यक्ती ज्यावेळी एखाद्या सभागृहात किंवा दालनात प्रवेश करते त्यावेळी तिथलं वातावरण एवढेच नव्हे तर आपला संपूर्ण उपस्थित असलेला परिवार एका नवीन ऊर्जेची अनुभूती अनुभवत असतो हेही आपण अनुभवलेले आहे.

या आपल्या सर्वसामान्य अनुभवातून आपण जर अतिशय बारकाईने आपण याचा अभ्यास केला तर– आपलं अस लक्षात येईल की– आपलं अंतर आणि बाह्य स्वरूप आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुदृढ ठेवण हे किती महत्त्वाच आहे. म्हणून मित्रांनो निरोगी शरीरात निरोगी अंतर मन असणे आवश्यक आहे कारण शरीर निरोगी आहे आणि जर आपल्या दुर्दैवाने अंतर्मन निरोगी नसेल तर चालणार नाही; कारण आपल्या परिपूर्ण विकसित अशा व्यक्तिमत्त्वाच्या या दोन्ही म्हणजेच अंतर आणि बाह्य व्यक्तिमत्वाच्या निरोगी अवस्थे शिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही.

तिसरी सादरीकरण करण्यासाठी जी अत्यंत महत्वाची आणि अत्यावश्यक गोष्टआहे तिचा आपण उदाहरणासहित विचार करूया!—डिसेंबर महिन्याची सकाळची गुलाबी थंडी पडलेली आहे आणि अशावेळी लोणावळा स्टेशनमध्ये मुंबई हुन निघालेली– ट्रेन थांबलेली आहे!– एक कॉफी वाला येतो आणि डब्यातील प्रवाशांना उद्देशून कॉफी कॉफी कॉफी म्हणत म्हणत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जात असतो!- त्याची कॉफी काही प्रवासी घेतात काही साखर झोपेत असतात पण त्याच वेळी दुसरा कॉफी वाला येतो आणि म्हणतो— ए गरम कॉफी ए गरम कॉफी- डब्यातील प्रवासी उठतात आणि आपल्याला खरोखरच गरम गरम कॉफी या थंडीच्या वातावरणात मिळणार आहे असा विचार करून त्याची कॉफी जास्तीत जास्त लोक घेण्याचा प्रयत्न करतात!–त्याने फक्त कॉफी च्या अगोदर गरम शब्द वापरला आणि तो शब्द प्रवाशांना कॉफी घेण्यास प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरला! याचा अर्थ तुमचं अंतर आणि बाह्य मन कितीही चांगलं तरी– सादरीकरण सुद्धा तेवढच महत्त्वाच आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!