ताज्या घडामोडी

साधुसंत ही राष्ट्राची अनमोल संपत्ती -आचार्य अभयशेखर सुरिश्वरजी महाराज..

जैन आचार्य अभय शेखर सुरीश्वरजी महाराज यांनी रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी श्री पार्श्व प्रज्ञालय तीर्थ या ठिकाणी झालेल्या विहार सेवकांच्या विभागीय मेळाव्यात काढले..

Spread the love

अध्यात्मिक..  साधुसंत ही राष्ट्राची अनमोल संपत्ती -आचार्य अभयशेखर सुरिश्वरजी महाराज..

साधु संत येती घरा, तोची दिवाळी दसरा”.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, १६ जानेवारी.

साधुसंत हे राष्ट्राची अनमोल संपत्ती आहे आणि तो ठेवा आपण जपून ठेवला पाहिजे असे प्रतिपादन जैन आचार्य अभय शेखर सुरीश्वरजी महाराज यांनी रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी श्री पार्श्व प्रज्ञालय तीर्थ या ठिकाणी झालेल्या विहार सेवकांच्या विभागीय मेळाव्यात काढले.

मावळ तालुका व पिंपरी चिंचवड या विभागीय विहार सेवकांच्या मेळाव्या प्रसंगी गुरु महाराज बोलत होते मावळ तालुका व पिंपरी चिंचवड भागातील विहार सेवकांचे कार्य हे कौतुकास्पद आहे रोज पहाटे चार वाजता उठून साधू संतांबरोबर त्यांना सुरक्षा प्रदान करणे व त्यांचा योग्य स्थळी विहार करण्यासाठी मदत करणे हे अवघड असे कार्य हे सर्व विहार सेवक मंडळी करीत आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचा विहार सुरक्षित व्हावा म्हणून ही सर्व मंडळी कौतुकास्पद असे कार्य करीत आहे व आम्हाला सुरक्षापूर्वीत आहे या सर्व सेवकांचे करू तेवढे कौतुक कमीच आहे.

परमपूज्य मुनिराज जयभानु सुरिश्वजी महाराज साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये विहार सेवकांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा घेतला व आज आयोजित केलेल्या विभागीय मेळावा श्री कीर्तीभाई सिंघानी यांनी आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

आजच्या विभागीय मेळाव्यासाठी २४० विहार सेवक मावळ तालुका व पिंपरी चिंचवड परिसरातून उपस्थित होते या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन सुरेशभाई दोशी, राकेश ओसवाल,अरविंदभाई कटारिया व भद्रेश भाई शहा यांनी केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!