ताज्या घडामोडी

पवनानगर येथे वनविभाग व  वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने एका बिबट्याला केले जेरबंद ..

Spread the love

पवनानगर येथे वनविभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने केले जेरबंद.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १६ जानेवारी.

पवनानगर येथे वनविभाग व  वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने एका बिबट्याला जेरबंद केले आहे.आता शेतामध्ये ऊसतोड चालू असल्याने बिबट्याच्या लपण्याच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे बिबटे मनुष्यवस्तीत येताना दिसत आहेत.

सोमवारी १६  जानेवारी  रोजी सकाळी  मौजे पानसोली ता.मावळ येथे बिबट्याचे दर्शन घडले. या संदर्भात स्थानिक महिला दिपाली आनंदा ठोंबरे यांचे दूरध्वनीवर प्राप्त संदेशनुसार सदर ठिकाणी हनुमंत. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ,  डी. पी. डोमे वनपाल देवळे, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक, मावळ यांचे सहाय्याने पानसोली (कोळेचाफेसर)  येथे बिबट्या तारेच्या कुंपणामध्ये अडकला. या बिबट्याच्या चारही पायाला काचेमुळे जखमा झाल्याने रेस्क्यु करण्यात आले.

बिबट्या जखमी असल्याने पुढील उपचारासाठी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव येथे पाठवण्यात आले आहे. सदर रेस्क्यु अॅापरेशन साठी एन.आर.प्रवीण (भा.व.से) मुख्य वनसंरक्षक प्रा. पुणे, राहुल पाटील, (भा.व.से) उपवनसंरक्षक प्रा. पुणे व आशुतोष शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक प्रा. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली एच. ए. जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ, श्रीमती डी. पी. डोमे वनपाल देवले, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा , वनकर्मचारी आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक मावळ संस्था, उपस्थित होते.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे निलेश गराडे, अनिल अंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत व जिगर सोलंकी उपस्थित होते व त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मदत केली.वनविभाग वडगाव मावळ तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या टीमने बिबट्याला जेरबंद केले आहे.अशी माहिती वनपरिक्षक अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!