ताज्या घडामोडी

मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळाच्यावतीने यावर्षी अयोध्येतील श्रीराममंदिराचा देखावा साकारणार..

डाॕ.पुरंदरे ग्राऊंडवर देखाव्याचे भूमिपूजन संपन्न..

Spread the love

मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळाच्यावतीने यावर्षी अयोध्येतील श्रीराममंदिराचा देखावा साकारणार..

डाॕ.पुरंदरे ग्राऊंडवर देखाव्याचे भूमिपूजन संपन्न .

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता ४ प्रतिनिधी

मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळाच्यावतीने यावर्षी अयोध्येतील श्रीराममंदिराचा देखावा साकारणार असून डाॕ.बी.एन.पुरंदरे शाळेमागे नगरपरिषदेच्या मैदानावर नुकतेच देखाव्याचे भूमिपूजन मंडळाचे संस्थापक प्रकाशशेठ चौव्हाण यांचे हस्ते संपन्न झाले.

गेली दोन वर्षे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम गणेशोत्सव मंडळांना या वर्षी गणेशोत्सव भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यास मिळणार आहे .याचाच एक भाग म्हणून पूर्वीप्रमाणेच भव्यदिव्य देखावे बनविण्यासाठी काही गणेशोत्सव मंडळांनी तयारी केली आहे.
लोणावळ्यातील मानाचा मावळचा राजा गणपती म्हणून श्री शिवाजी मिञ मंडळाचेवतीने यावर्षी अयोध्या येथील नियोजित श्रीराम , लक्ष्मण ,जानकी मंदिराची भव्यदिव्य प्रतिकृती साकारली जात आहे. या मंदिराचे भूमिपूजन डाॕ.पुरंदरे विद्यालयाचे मागील मैदानावर संपन्न झाले. यावेळी श्री शिवाजी मिञ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ मेघराज चौव्हाण, पदाधिकारी राजू चौव्हाण, दिलीप पवार , शौकीशेठ आगरवाल , तसेच हिंदू समितीचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. त्यात संदिप गायकवाड , शैलेश भोसले, रिक्की मते, सदाशिव सोनार, हनुमंत भोसले , गनेश रोधळ, दिनेश पवार, भारत चिकणे , दिपक कांबळे आदींचा समावेश आहे.तसेच मंडळाचे मान्यवर सभासद आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव मंडळाचे मंदिर सुमारे ८० फूट लांब आणि ८० फूट रूंद तसेच नव्वद फूट उंच असे हे भव्य श्रीराम मंदीर , साकारणार असल्याने त्याचे विधिवत भूमिपूजन श्री प्रकाश चौव्हाण यांचे हस्ते झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!