ताज्या घडामोडीराजकीय

केज मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलून टाकणार – लहू बनसोडे ,

अंबाजोगाई / प्रतिनिधी :- केज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मी केज विधानसभा 2024 चा अपक्ष उमेदवार लहू बनसोडे केज विधानसभा सभेला निवडणुकीसाठी उभा आहे. केज विधानसभा 2024 चा अपक्ष उमेदवार म्हणून पाथरा तालुका( केज ) जिल्हा बीड या केज मतदार संघातून मी आपल्या जनतेच्या सेवेसाठी त्यांना न्याय देण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. कुठलाच राजकीय वारसा नसलेले पदवी पर्यंत शिक्षण घेतलेले मतदार संघाचा अभ्यास असणारे जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ,अन्यायाविरुद्ध लढणारे, जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना न्याय देणारे , अन्यायाविरुद्ध लढणारे व्यक्तिमत्व असणारे लघु बनसोडे साधे , सरळ आणि गरीब होत करू यांची जाण असणारे व्यक्तिमत्व असून जनतेसाठी सतत धडपडणारे एस . सी उमेदवार आहेत ते अपक्ष म्हणून लढत आहेत. केज मतदार संघात स्त्रिया सुरक्षित नाहीत अशा एक ना अनेक समस्या आहेत. आज मतदारसंघात शेतकरी अनेक समस्यांनी घेरला आहे. अत्यंत हाल चालू आहेत. केज येथे बस डेपो नाही. मागील लोकप्रतिनिधींनी फक्त विकासाचा डांगोरा पेटला परंतु विकास केला नाही. आपला बीड जिल्ह्याचा विकास करण्याची आणि जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी जनतेने मला संधी द्यावी. छोटे राज्य , छोटा जिल्हा विकास झपाट्याने होतो. शेतकऱ्यांना लाईट फुकट देण्यासाठी प्रयत्न करणार. बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या समस्या सोडवणार, विधानसभेत मतदार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी एक वेळ जनतेने मला संधी द्यावी. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार, शासनाला विनंती करून सर्व समस्या सोडवणार ,लाडक्या बहिणीसाठी आठ हजार रुपये महिना करणार, अंबाजोगाई जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार शेतकरी जगला पाहिजे. आज जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत, गोरगरिबांची मुले शिक्षण पासून कोसो दूर आहेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार जेणेकरून गरीब मुले शिकली पाहिजेत. शेतकऱ्यांना उपयुक्त योजना आणणार ,बाजार तळ बांधणार , पत्रकारांसाठी शासकीय पत्रकार भवन बांधणार ,आतापर्यंत लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. प्रत्येक घरोघरी भेटी देऊन जनतेचा आशीर्वाद घेणार, जनतेच्या पाठिंब्यावर आमदार होणारच, शिवसेनेकडून उमेदवारी नाही मिळाली म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी अपक्ष लढतोय असे श्री. लहू बनसोडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव दिला जाईल तसेच जुने प्रतिनिधी सांगतात जनतेचा विकास केला परंतु नेमका विकास म्हणजे काय केला? जुनी बिल्डिंग झाल्या वर नवी बांधावीच लागते यांनी जनतेला फक्त आश्वासनेच दिली मी जनतेची कामे करूनच दाखवणार एक वेळेस आपली सेवा करण्याची जनतेने मला संधी द्यावी.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!