ताज्या घडामोडी

पिंपरी येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने भोंडला कार्यक्रम साजरा..

पिंपरी येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात नवरात्री निमित्त भोंडल्याचा पारंपारिक कार्यक्रम घेण्यात आला

Spread the love

पिंपरी येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने भोंडला कार्यक्रम साजरा..

 आवाज न्यूज: गुलाम अली भालदार  चिंचवड ०३ :

पिंपरी येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात नवरात्री निमित्त भोंडल्याचा पारंपारिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा ढोकरे यांनी केले. प्राचार्य दिलीप देशमुख आणि उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जाधव यांच्या हस्ते हत्तीपूजन झाले.

सद्यस्थितीत आत्मनिर्भर होण्यासाठी मुलींनी कसे वागावे हा संदेश अनुजा गडगे, मनोरुपा गायकवाड, जयश्री माने, चैताली मिरगणे, नंदिनी जाधव सोनाली काळे, गौरी जाधव यांनी नवरंगाचे महत्व सांगत दिला.

नीलिमा ब्रम्हेचा यांनी खुमासदार निवेदन केले.त्यांनी विविध प्रश्न विचारत कार्यक्रमाची रंगत वाढवली.योग्य उत्तराला आकर्षक बक्षीस मिळाल्याने सर्व मुली खुश झाल्या. त्यानंतर हादग्याची पारंपारिक गाणी गात मुलींनी फेर धरला.

फुगड्या खेळल्या. वाद्याचा ठेका धरत नृत्य केले. आधुनिकतेची कास धरत गरबा आणि दांडिया खेळला. कवी प्रा. संपत गर्जे यांनी युगंधरा मी नव्या युगाची ही स्वरचित कविता सादर केली.

सर्व सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांनी शिस्त सांभाळली. उत्साही वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!