ताज्या घडामोडी

सहदेव मखामले यांच्या ‘सदाफुली’ ग्रंथाचे प्रकाशन..

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा समारंभ होणार असून या प्रसंगी डॉ. न. म. जोशी हे अध्यक्षस्थानी असतील..

Spread the love

सहदेव मखामले यांच्या ‘सदाफुली’ ग्रंथाचे प्रकाशन

आवाज न्यूज: प्रतिनिधी,  तळेगाव दाभाडे, ४ ऑक्टोबर

.

सुशीला मंगल  कार्यालयाच्या हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा समारंभ होणार असून या प्रसंगी डॉ. न. म. जोशी हे अध्यक्षस्थानी असतील. बाळासाहेब शिवरकर, मा. आ. बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, अँड. रंजनाताई भोसले हे प्रमुख पाहुणे असतील.

डोंबीवलीच्या वेदांत प्रकाशनाने दि . २९ प्रसिद्ध लेखक, कवी तसेच साहित्य, कला, संस्कृती मंडळाचे संस्थापक व विश्वस्त अॅड. सहदेव मखामले यांच्या ‘सदाफुली’ या आत्मकथन ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार ९ ऑक्टोबर रोजी सुशिला मंगल कार्यालय येथे हा ग्रंथ प्रसिद्ध केला जाईल.

. गेल्या ५० वर्षात मखामले यांनी असंख्य पद्यरचना कविता, शेकडो कथा, कादंबऱ्या लोकनाट्य याचे लेखन केलेले असून या वाटचालीस आलेल्या भल्या बुऱ्या आठवणींचे कथन या ग्रंथात असल्याचे प्रकाशिका . सुप्रिया कुलकर्णी म्हणाल्या.

प्रकाशनाला अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन शैलेश मखामले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!