मावळ तालुक्यात अंधश्रद्धा फोफावली..
महिलेचा फोटो काळी बाहुली, लिंबू लावत टाचण्या टोचत, बिबेक लाऊन बाबळीच्या झाडाला लटकावली..
मावळ तालुक्यात अंधश्रद्धा फोफावली..महिलेचा फोटो काळी बाहुली, लिंबू लावत टाचण्या टोचत, बिबेक लाऊन बाबळीच्या झाडाला लटकावली..
आवाज न्यूज: टाकवे मावळ(प्रतिनिधी) १ सप्टेंबर :
मावळ तालुक्यामधील टाकवे बुद्रुक हद्दीतील बेलज या गावात अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. आंदर मावळ मधील टाकवे बेलज या रस्त्याने स्थानिक नागरिक प्रवास करत असताना बेलज येथील रोडच्या बाजूला बाभळीच्या झाडाच्या फांदीला एका महिलेचा फोटो, एक काळी बाहुली, एक लिंबू टांगलेल्या अवस्थेत दिसून आला आहे.त्या काळ्या धाग्याला एक चिठ्ठी बांधलेली सापडून आली आहे. एकीकडे मनुष्याने विज्ञानाची कास धरत समुद्राचा तळ शोधला व आकाशाला गवसणी घातली असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आजुनही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे. मावळ तालुक्यात सातत्याने विविध ठिकाणी अंधश्रद्धेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दोन वर्षापूर्वी निवडणूक काळात टाकवे बु गावात असाच प्रकार उघडकीस आला आहे.
त्यापुर्वी पवनानगर भागातील एका गावामध्ये, तांत्रिक मांत्रिक स्वतःची पोटं भरण्यासाठी नागरिकांना फसवितात. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना होत असलेला त्रास व निर्माण होणाऱ्या अडचणी यामागे दैविक कारण असल्याचे भासवत असे प्रकार करण्यास भाग पाडतात. त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवितात. मात्र काही लोकं या भोंदूगुरीला बळी पडत असल्याने आजच्या विज्ञानाच्या जगात देखील असे अंधश्रद्धेचे प्रकार घडत आहेत. आज बेलज येथे असाच काहीसा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिट्टी मध्ये माहिती अशी आहे..
माझ्या मुलाच्या नशिबातून पुजा सुनिता तिची मावस भाऊ ही माझ्या मुलाच्या पुजा आणि वेडी पिसी झाली पाहिजे. पुजा माझ्या मुलाच्या जिवणातून वेडी पिसी होऊन गेली पाहिजे तिचे होऊन त्याला सोडुन जाणे पाहीजे.
पोलीस प्रशासनाने या घटनांचा छडा लावत असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.



