ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे धर्मादाय रुग्णालयांच्या बाबतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

रुग्णांसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राची तत्परतेने योग्य ती दखल घेतलीच पाहिजे.

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे धर्मादाय रुग्णालयांच्या बाबतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली.

आवाज न्यूज: पुणे प्रतिनिधी, १ सप्टेंबर.

रुग्णालयात गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. रुग्णालयातील अशा रुग्णास बाहेरून औषधे आणावयास लावू नये. अशा रुग्णांसाठी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्राची तत्परतेने योग्य ती दखल घेतलीच पाहिजे. रुग्णालयात २४ तास जनसंपर्क अधिकारी उपलब्ध असावेत या सह अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

काही रुग्णालये उत्तम कामगिरी करत आहेत, त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन परंतु अद्याप अनेक रुग्णालयात या अनुषंगाने सुधारणा होणे गरजेचे आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेशजी देशमुख , धर्मदाय सह आयुक्त बुके साहेब, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी  संजय तेली साहेब तसेच धर्मदाय रुग्णालयांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!