ताज्या घडामोडी

व्ही.जे.एन.टी. सेलच्या वतीने मोहननगर येथील पालिकेच्या शाळेत वृक्षारोपण व पालकत्त्व घेतलेल्या गुणवंत मुलीला धनादेश कार्यक्रम संपन्न

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या प्रागणांत वृक्षारोपण व स्थानिक रहिवासियांना वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

Spread the love

व्ही.जे.एन.टी. सेलच्या वतीने मोहननगर येथील पालिकेच्या शाळेत वृक्षारोपण व पालकत्त्व घेतलेल्या गुणवंत मुलीला धनादेश कार्यक्रम संपन्न

आवाज न्यूज: गुुुलामअली भालदार चिंचवड प्रतिनिधि  05

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्या अध्यक्षा निर्मला माने यांच्या नेतृत्वाखाली मोहननगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या प्रागणांत वृक्षारोपण व स्थानिक रहिवासियांना वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमातच या परिसरातील गुणवंत विद्यार्थीनी कविता काळे हिचे पालकत्व सेलच्या अध्यक्षा निर्मला माने यांनी स्विकारला पक्षाच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्याहस्ते धनादेश देण्यात सुपुर्त केला.

यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संजय सस्ते, मुख्याध्यापिका कल्पना राऊत, मुख्याध्यापक रविंद्र शिंदे, शहराध्यक्षा कविता आल्हाट, दादा साहेब माने, सेलचे अध्यक्ष धीरज तामचीकर, कार्याध्यक्ष गुलामअली भालदार, ज्योती निंबाळकर, सुरेखा झिंटे, ज्योती गोफणे, सविता लगस, तृतीयपंथी सेलचे अध्यक्ष किरण वाघ, स्वप्नील डोलरे, आयुष चांदणे, नरेश भंडारे, रुपेश वल्लीक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होतो. यावेळी अनेकांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तसेच, परिसरातील नागरिकांना आपल्या प्रांगणात लावण्यासाठी वृक्षभेट विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!