ताज्या घडामोडी

औंढे खुर्द येथील शेवंताबाई आंबेकर यांचे निधन..

Spread the love

औंढे खुर्द येथील शेवंताबाई आंबेकर यांचे निधन..

आवाज न्यूज मच्छिंद्र मांडेकर लोणावळा ता.५ प्रतिनिधी 

औंढे खुर्द येथील जेष्ट महिला शेवंताबाई गेणू आंबेकर (वय-९०) यांचे अल्पशः आजाराने ता.५ रोजी राञी साडे सात वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिवावर ता.२ रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात तीन विवाहीत मुलगे , सुना , नातवंडे व नाती तसेच पतवंडे असा परिवार आहे. औढे येथील युवक कार्यकर्ते साईनाथ ज्ञानेश्वर आंबेकर हे त्यांचे नातू होत.


तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ माऊली गेणू आंबेकर , विठ्ठल गेणू आंबेकर ,विलास गेणू आंबेकर हे त्यांचे सुपुञ होत.
त्यांचे थोरले सुपुञ तुकाराम गेणू आंबेकर यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले आहे. तसेच एक नातूचेही काही वर्षापूर्वी अपघातात निधन झाले आहे. कै.शेवंताबाई आंबेकर या गावामधेच सद्गुरू च्या बैठकीला जात असत .
जुन्या पिढीतील कै.शेवंताबाई आंबेकर या अत्यंत मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे औंढे व औंढोली या दोन्हीही गावात परिचित होत्या….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!