ताज्या घडामोडी

नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पहिल्याच दिवशी नागरिकांसाठी बैठक तळेगावदाभाडे येथे संपन्न…….

आमचे लक्ष हे इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे केंद्रित केलेले असून या वयातच त्यांना वेगळे वळण लागू शकते या संदर्भात प्रत्येक शाळे मध्ये आम्ही पोलीस स्टेशनची मीटिंग घेऊन समुपदेशन करणार.. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे...

Spread the love

नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पहिल्याच दिवशी नागरिकांसाठी बैठक….

आमचे लक्ष हे इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे केंद्रित केलेले असून या वयातच त्यांना वेगळे वळण लागू शकते या संदर्भात प्रत्येक शाळे मध्ये आम्ही पोलीस स्टेशनची मीटिंग घेऊन समुपदेशन करणार.. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे…….

आवाज न्यूज: प्रतीनिधी ९|७|२०२२ तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी साधारण दोन दिवसांपूर्वीच भोसरी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणारे नितीन लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक कॉलनी भागात नागरिकांची मीटिंग घेण्यात यावी या अनुषंगाने आज सायंकाळी मस्करनीस कॉलनी दोन येथे नागरिकांसाठी त्यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीचे नियोजन महिला दक्षता समिती सदस्य विणाताई करंडे यांनी मस्करनीस कॉलनी दोन येथे केले यावेळी महिलांशी बोलताना आपण आपली संस्कृती व संस्कार जपले पाहिजे पाहिजे असे त्या म्हणाल्या.

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाबळे साहेब यांनी उपस्थित महिलांना आपण महिला वर्गाचा ग्रुप तयार करून त्यामध्ये दक्षता समिती व पोलीस महिला अंमलदार यांना घेऊन काही संशयास्पद आढळल्यास ग्रुप वर मेसेज टाकून त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले.
शाळा व्यवस्थापनाने नक्की कोणती काळजी घ्यावी ,सोसायटीतील धारकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच हुशार व कामाचा अनुभव असणारा सिक्युरिटी ठेवावा जेणेकरून काही संशयास्पद घटना किंवा हालचाल दिसल्यास आपणास मदत होऊ शकते तसेच फ्लॅट मालकांनी भाडेकरू ठेवताना त्याचे नोंद पोलीस स्टेशनला करावी असे आवाहन केले तसेच आमचे लक्ष हे इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे केंद्रित केलेले असून या वयातच त्यांना वेगळे वळण लागू शकते या संदर्भात प्रत्येक शाळे मध्ये आम्ही पोलीस स्टेशनची मीटिंग घेऊन समुपदेशन करणार आहोत असे देखील लांडगे साहेबांनी सांगितले.

सोन साखळी चोरी सारखे प्रकार घडू नये यासाठी महिलांसाठी नक्की कोणती काळजी घ्यावी तसेच येणारी एकादशी व ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याप्रसंगी कॉलनीतील अनेक महिला वर्ग व नागरिक उपस्थित होते.
कॉलनी भागात पहिल्यांदाच अशी बैठक झाल्याने नक्कीच मला अतिशय समाधान वाटत आहे असे पोलीस स्टेशनचे ग्रामसुरक्षा दल सभासद व स्थानिक नागरिक सुरेश शिंदे यांनी सांगितले .
कधीही अत्यावश्यक सेवा म्हणून काही गरज असल्यास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ,अमलंदार आपल्या सोबत असतील अशी ग्वाही त्यावेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे साहेब यांनी नागरिकांना दिली . त्यावेळेस ग्रामसुरक्षा दलातील सभासद व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळेस उद्योजक गोरख काकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांचे कौतुक करताना सांगितले की तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आमच्या भागातच राहत असल्याने जणू काय त्यांनी आमच्या भागाला वेढा दिला आहे व आम्ही कशाप्रकारे सुरक्षित आहोत असे सांगितले , वर्धमान बिल्डिंग येथे राहणारे प्रोफेसर अशोक गायकवाड सर यांनीही सोशल मीडिया वापरताना नक्की काय काळजी घ्यावी याची उत्तम प्रकारे माहिती दिली. कोच टीचर असणाऱ्या सुजाता मलगे यांनी प्रत्येक महिलांनी घरातील पोलीस बनवून आपल्या मुलांवर कशाप्रकारे लक्ष ठेवावे याची सविस्तर माहिती दिली.

त्यावेळेस मनकर्णिका महिला महासंघ यांच्यामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे साहेब, वाबळे साहेब , मुंडे साहेब तर ग्रामसुरक्षा दल सभासद सुरेश शिंदे व विलास गायकवाड यांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
युवा उद्योजक सागर टकले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्य चारुताई काटे तसेच कॉलनीतील सभासद अश्विनी आंबेकर ,राधा बनकर , सुजाता मलगे, मधुबाला काळखैरे , गायकवाड ,सुचित्रा सावंत , शुभांगी भेगडे ,सुलोचना चव्हाण , सुप्रिया पाटील ,अर्चना बांगर , प्रियंका साठे यांचे सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!