तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्यामंदिरात प्राथमिक विभागाचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा!!
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या अश्विनी मिठे/ भोसले सोनी मराठी वरील मी होणार सुपरस्टार फेम लाभल्या...
तळेगाव दाभाडे येथील आदर्श विद्यामंदिरात प्राथमिक विभागाचा दिंडी सोहळा उत्साहात साजरा !!
आवाज न्यूज: तळेगाव प्रतिनिधी ९|७|२०२२ आषाढी एकादशी जवळ येऊ लागली की, अनेकांना विठुरायाची ओढ लागते, पावले पंढरीच्या वाटेला लागतात मनात फक्त एकच ध्यास असतो विठू माऊली चा …
उद्या होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त आदर्श विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथील शाळेत प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख करत टाळ मृदंगाच्या नादात ग्यानबा तुकाराम परिसर दुमदुमुन सोडला.
यावेळेस कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी मिठे/ भोसले सोनी मराठी वरील मी होणार सुपरस्टार फेम उपस्थित होत्या त्यांनी कानडा राजा पंढरीचा हा अभंग सादर करून उपस्थिती विद्यार्थीवर्ग व शिक्षकांना पालकाना मंत्रमुग्ध केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिज्ञा मांडे यांनी पाहुण्यांची ओळख व स्वागत केले इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता तिसरी मधील कुमारी सौम्या अलबते हिने केले तर कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका योगिता रासकर, कल्पना गाडे व राधा तापकीर यांनी केले.
उपस्थित पाहुण्यांचे आभार कुमारी श्रुती देशमुख हिने केले जोशी काका व वैरागी मावशी यांनी कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केली.
या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाबरोबर पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता लहान मुलांच्या चेहऱ्यावर काहीतरी आगळे वेगळे शिकल्याचे भाव जाणवत होते यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.



