ताज्या घडामोडी

राज्यातील ९२ नगरपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, १८ ऑगस्टला होणार मतदान!

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.

Spread the love
राज्यातील ९२  नगरपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, १८ ऑगस्टला होणार मतदान!
आवाज न्यूज: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.
राज्यात नगरपरिषद निवडणुका जाहीर

महाराष्ट्र Elections २०२२ : राज्यातील ९२ नगर परिषदा  आणि चार नगरपंचायतीच्या, सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. आज निवडणूक आयोगाने (Election Commission) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, २० जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी आणि वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. तर अर्ज भरलेल्या उमेदवारांना ४ ऑगस्टपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपरिषदा आणि ४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्याबाबतची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने त्यावेळी खूप पाऊस असणार आहे. त्यामुळे भर पावसात या निवडणुका होणार असल्याचे चिन्ह आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!