वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान च्या वतीने १ मे ला कामगार दिन साजरा.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहर विकसित होत असताना वडार समाजाचा वाटा आहे.समाजाने केलेल्या कार्यासाठी बर्ड व्हॅली गार्डन मध्ये वडार दांम्पत्य शिल्प साकारले आहे .वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान च्या वतीने १ मे ला कामगार दिन साजरा केला जातो. या वर्षी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठान च्या वतीने समाजभुषण म्हणून मनिषा प्रमोद मोहिते विक्रीकर अधिकारी यांचा सत्कार कार्यक्रम अध्यक्ष सुरेश धोत्रे मा.नगरध्यक्षा तळेगाव मी व.म.कार्यध्यक्षा व मनोहर बंदपट्टे अविर सचिव मंत्रालय यांच्या हस्ते झाला. तसेच समाज गौरव पुरस्कार अंकुश मारूती चौगुले अक्कलकोट सोलापूर, सुनिल फडतरे,लक्ष्मण विटकर,आरती धोत्रे, विजय पवार,विष्णू चौगुले, तायप्पा चव्हाण,हरिष बंडीवडार, शैक्षणिक पुरस्कार गणेश देवकर व शिल्पकार पुरस्कार ज्ञानेश्वर धोत्रे,हिरामण डुकरे, विलास इरले यांना प्रधान करण्यात आला.

या कार्यक्रमास विशेष सहकार्य मा.उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका वैशाली ताई काळभोर, अनुराधा गोरखे, शहराध्यक्ष कैलास कदम, उद्योजक विशाल यादव,यांचा लाभला प्रमूख उपस्थित अजित गव्हाणे रा.क्रॉ.पिंपरी चिंचवड शहर सामाजिक कार्यकर्ते दिलीप दातीर पाटील,प्रसाद शेट्टी,नगरसेवक जगदीश शेट्टी (सत्तारूढ पक्षनेते), विशाल काळभोर (युवा अध्यक्ष), राहूल दातीर पाटील,मनिष काळभोर, नितीन आण्णा धोत्रे,राकेश विटकर,ललीता धनवटे सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते.देहू नगरपरिषद नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल मीना कुर्हाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची संयोजना संस्थापक अध्यक्ष शामराव विटकर, अध्यक्ष अनिल विटकर, सचिव अमर दौंडकर सहसचिव लखन पाटकर, नागेश पवार, राहुल दौंडकर, राजीव कुसाळकर,अनंत नलावडे, अमोल पवार यांनी केला.



