ताज्या घडामोडी
लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून पंडीत पाटील यांची नियुक्ती ..
लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून पंडीत पाटील यांची नियुक्ती ..
लोणावळा ता.२ (प्रतिनिधी ) लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून पंडीत पाटील यांची नियुक्ती झाली असून त्यांनी ता.२७ एप्रिल रोजी पदभार स्विकारला . त्यांचे नगरपरिषद कर्मचारी , विविध राजकीय पक्ष ,पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. .पाटील हे यापूर्वी कागल , कोल्हापूर नगरपरिषद येथे कार्यरत होते. त्यांनी जत, माजलगाव , म्हसवड व कागल चे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. येथील पूर्वीचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची औरंगाबाद महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. .



