पिंपळोली मधील जि.प,प्राथमिक शाळेमध्ये 1मे महाराष्ट्रदिन व कामगारदिनानिमित्त एक वेगळा समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात आला..
मावळ तालुक्यातील शिक्षणाच्या बाबतील सतत अव्वल असणारी पिंपळोली मधील जि.प,प्राथमिक शाळेमध्ये 1मे महाराष्ट्रदिन व कामगारदिना निमित्त एक वेगळा समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात आल. आपल्या घरासाठी आणि देशाच्या उपयोगी कामासाठी हातभार लावणारे भर उन्हात रेल्वेची सर्विस करणारे गावातील रिटायर झालेले व स्वीकारलेले कामगार यांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात आलाा. त्यांना शाल श्रीपळ देऊन गौरविण्यात आलेे.
यावेळी कामगार वर्ग आपल्या जुन्या आठवणीने न्हाऊन निघाला आणि थोडासा भावुक ही झाला. या सर्वांनी आपले आशिर्वाद जि.प.प्राथमिक शाळेला दिले व या कार्यक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले. आज त्यांचा त्यांच्याच गावामध्ये इतक्या वर्षात पहिल्यांदाच हा सन्मान आम्हाला मिळत आहे आणि ते मिळवुन देण्याचे काम या मुलांनी केले असे बोलुन त्यांनी तंटामुक्त अध्यक्ष संतोष बोंबले व आरपीआय नाणेमावळ अध्यक्ष सिध्दार्थशेठ चौरे यांचे खास करुन आभार मानले आणि यामध्ये गावामध्ये कोरोनाकाळात गावासाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या समाजसेविका, आशावर्कर सौ. स्वप्नाताई संतोष बोंबले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
आयोजन शालेय व्यवस्थापन समिती व जि.प.प्राथमिक शाळा पिंपळोली यांनी केले होते.गावचे तंटामुक्त अध्यक्ष व शिवसेना उपविभागप्रमुख संतोष बोंबले व नाणे मावळ आरपीआयचे अध्यक्ष विद्यमान ग्रा.पं.सदस्य सिध्दार्थशेठ चौरे,उपसरपंच संदिपशेठ चौरे यांनी याचे खास आयोजन केले, त्याला उत्सपुर्त आसा प्रतिसाद गावातील कामगारांनी दिले व तोंडभरुन कौतुक ही केले, नेहमी समाजउपयोगी कार्यक्रम घेणाऱ्या या टिमचे गाववाल्यांकडुन आणि शिक्षकवर्गाकडुन सन्मान करण्यात आला .यावेळी ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना पेय वाटण्यात आलेे. यामध्ये दळवी सर,सोमवंशी सर, यांचे खुपच मोलाचे सहकार्य लाभले होनावळे मॕडम,रोकडे मॕडम, बारावरकर मॕडम,घोडेकर मॕडम व तसेच अंगणवाडी शिक्षिका मुक्ताबाई बोंबले,मदतनीस वत्सला गुजर ,एकनाथ शिंदे,पप्पु सुतार, सुनील लोखंडे,सुभाष गायकवाड ,शिवभक्त चंद्रकांत बोंबले, विठ्ठल पिंपळे,यांनी सहकार्य केले .
यामध्ये गावातील कामगारवर्ग उपस्थित होता .बाळासाहेब तावरे,हभप पंडु जानकु बोंबले,विष्णु घोगरे, सदाशिव टोपे,मारुती गुजर,बाळु गुजर,अर्जुनशेठ पिंपळे,सखाराम चौरे,किसन दरडे,राम लक्ष्मण पिंपळे,बापु पिंपळे,दत्तात्रय गुजर, पांडुरंग गायकवाड ,दत्तात्रय गायकवाड ,बबन पवार,लहु पवार, सबा पिंपळे,चिंधु गायकवाड ,रामचंद्र बोंबले,सुरेश बोंबले, दिलिप पिंपळे,यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला.



