ताज्या घडामोडी

अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात…

मावळ तालुक्यातील अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद कांब्रे येथे उत्साहात साजरी..

Spread the love

अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात…

आवाज न्यूज: उमेश माळी मावळ प्रतिनिधी ६ ऑगष्ट .

मावळ तालुक्यातील अतिदुर्गम खांडी केंद्राची शिक्षण परिषद कांब्रे येथे उत्साहात साजरी झाली.बोरवलीपासून निळशीपर्यंतचे सर्व शिक्षक शिक्षण परिषदेस उपस्थित होते.केंद्रप्रमुखपदी नव्याने नियुक्त झाल्याने सुनिल साबळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गंगाराम केदार,यशवंत पवार,खंडू शिंदे,विनायक पारखे,दिपाली निमकर इ.मान्यवर उपस्थित होते.तज्ञ मार्गदर्शिका रुपाली गायकवाड यांनी निपूण भारत प्रतिज्ञा घेतली.

निपूण भारत अभियानाचे ध्येय,पायाभूत साक्षरता,यातील विविध उपक्रम,सद्यस्थिती याविषयी सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.यावेळी झालेल्या चर्चेत संगिता दाते,दिपाली पारखे,सुशिल कांबळे,रामेश्वर बागडे,राहूल राठोड यांनी सहभाग घेतला.उमेश माळी यांनी भाषा,गणित व इंग्रजी या विषयांचे गटकार्य घेतले.गटकार्याचे सादरीकरण सुजाता भोसले,शिवाजी चौगुले,दत्तात्रय डावखर,राजू वाडेकर,सुनिता गवारी यांनी केले.केंद्रप्रमुख सुनिल साबळे यांनी प्रशासकीय सुचना देऊन हर घर तिरंगा अभियानाविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक खंडू शिंदे यांनी तर आभार सुवर्णा वाडिले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!