आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वार्षिक स्नेहसंमेलनात बालचिमुकल्यांच्या बहारदार सादरीकरणाने रंगत भालगाव नं. १ जिल्हा परिषद शाळेत उत्साहात सोहळा पार पडला
भरारी न्युज.. केज – तालुक्यातील भालगाव नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. या सोहळ्याला युसुफ वडगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. चोपणे यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धनंजय गुजर आणि माजी सरपंच युवराज ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणपती गीतांनी झाली. त्यानंतर बालचिमुकल्यांनी आस्ते कदम, भारुड, स्कूल चले हम, नन्ना मुन्ना राही हूँ, बेटी हिंदुस्तान की, ईद मुबारक, मेरी प्यारी माँ आणि गोंधळ या गीतांवर बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या आकर्षक आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित गावकरी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास राऊत, श्याम मोरे, अजित मोरे, सुनील मोरे, खंडू विभुते, गणेश हंडीबाग, अंकुश विभुते, विशाल विभुते, जलील शेख वकील यांच्यासह गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहिभाते मॅडम, बावस्कर मॅडम आणि मुख्याध्यापक अजय काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन फहरत बाजी आणि अमतुल बाजी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला.




