ताज्या घडामोडी

देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे 

Spread the love

देहू : मावळ तालुक्यात नव्याने नगरपंचायत झालेल्या देहू गावच्या नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण यांची उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

देहू नगरपंचायतीची प्रथम सभा आज पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी काम पाहिले. नगराध्यक्षपदासाठी स्मिता चव्हाण व उपनगराध्यक्ष पदासाठी रसिका काळोखे यांचे अर्ज आल्याने दोन्ही पदासाठी बिनविरोध निवड झाली.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी झाल्या असून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार सुनिल शेळके व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!