ताज्या घडामोडी

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या तालुका वारकरी सेवा समितीच्या अध्यक्षपदी देवराम सातकर; तर नाणेमावळ अध्यक्षपदी महेंद्रशेठ ढोरे यांची नियुक्ती

Spread the love

लोणावळा : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या मावळ तालुका वारकरी सेवा समितीच्या अध्यक्षपदी देवराम सातकर यांची तर नाणेमावळ अध्यक्षपदी महेंद्रशेठ ढोरे यांची निवड आज सेवाधाम येथे माघ शुध्द दशमी निमित्त आयोजित बैठकीत मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी जाहीर केली.

सुमारे चाळीस ग्रामप्रतिनिधी , नाणेमावळ , पवन मावळ आणि आंदर मावळ विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ सचिव रामदास पडवळ , उपाध्यक्ष दिलीपशेठ वावरे, कार्याध्यक्ष शिवाजी पवार, कायदेशीर सल्लागार सागर शेटे, लक्ष्मण ठाकर, बजरंग घारे, नितीन आडिवळे, महादू नवघणे , तसेच ह.भ.प. बाळासाहेब काजळे , औंढे , ग्रामप्रतिनिधी सखाराम घनवट , पवन मावळ विभाग आध्यक्ष गणपत पवार,विभागप्रमुख युवराज देवकर , शंकरराव शेटे, महादेव साठे , सुरेश कांबळे , गुलाबराव बधाले, विभागप्रमुख सोमनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

वारकरी सेवा मंडळचे सभासद पदी शंकर बळवंत शेटे यांनी श्रीक्षेञ भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज यांचे मंदिरात सप्ताहात दुध पुरविल्याबद्दल त्यांचा सत्कार मंडळांच्या वतीने करण्यात आला. यावेळी नाणेमावळ अध्यक्ष श्री देवराम सातकर यांची मावळ तालुका वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. वडगाव ग्रामप्रतिनिधी व श्री पोटोबा महाराज वारकरी दिंडीचे अध्यक्ष महेंद्रशेठ ढोरे यांची नाणेमावळ अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांचा शाल श्रीफळ देवून विभागप्रमुख सदाशिव पेटकर, आनंदराव गराडे, आणि निलेश शेटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पवन मावळ विभागप्रमुख शांताराम लोहर, आंदरमावळ विभागप्रमुख दिपकशेठ वारिंगे आदींनीही मनोगत व्यक्त केले. सूञसंचालन सचिव रामदास पडवळ यांनी केले. ह.भ.प.दत्ताञेय हजारे यांनी व विभागप्रमुख गणपत पवार , मच्छिंद्र मांडेकर , सखाराम घनवट , तसेच मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ अध्यक्ष श्री भसे , सचिव श्री पडवळ आणि नाणेमावळ नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.ढोरे यांनी मनोगतात विचार मांडले. आभार ह.भ.प.बाळासाहेब काजळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!