ताज्या घडामोडी

इंडियन मेडिकल असोसिएशन तळेगावची वार्षिंक सभा संपन्न

Spread the love

तळेगाव : इंडियन मेडिकल असोसियशन तळेगांव दाभाडे यांची वार्षिक वैदयकिय सभा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही  घेण्यात आली. रविवार (दि.5 डिसेंबर) रोजी एमराल्ड रिसॉर्ट, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, पुणे येथे TIMACON 2021 (टीमाकॉन 2021) पार पडली.

या सभेचे सभापती डॉ. अमित कुलकर्णी तर सचिव इंडियन मेडिकल असोसियशन तळेगांव दाभाडेचे
अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गोपाळघरे हे होते. यावर्षी पहिल्यांदाच स्व.प्रा.डॉ. दिलीप भोगे सर यांच्या स्मरणार्थ एक विशेष सत्र चालू केले गेले. या सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आय.एम ए.महाराष्ट्राचे  माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे उपस्थित होते. याचबरोबर आय. एम. ए. महाराष्ट्राचे वरीष्ठ उपाध्यश डॉ. प्रकाश मराठे हे सन्माननिय अतिथी म्हणून उपस्थित होते.

सालाबादाप्रमाणे यावर्षीही जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. यावर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी मावळातील वरिष्ठ शल्यचिकीत्सक डॉ. संजीव कडलसकर आहेत.

यासभेसाठी डॉ. निलेश नारखेडे, डॉ. युवराज बढे, डॉ. अनीश भट, डॉ. सचिन विटनोर व  राकेश गरुड या सर्वांचे विशेष सहकार्य झाले. यासभेत डॉ. अशोक निकम,डॉ.शाळीग्राम भंडारी,डॉ. शशिकांत पवार आशा अनेक वरिष्ठ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले.

यासभेत वेगवेगळ्या महत्वाच्या वैद्यकीय विषयांवर संपूर्ण महाराष्ट्रातील मान्यवर वक्त्यांकडून मार्गदर्शन केले गेले. त्याचबरोबर विविध विषयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे वैदयकीय पेपर सादर कले. यासभेमुळे मावळ व पुणे येथील वैदयकिय तज्ञांना मोलाची अद्यावत माहिती मिळाली, जेणेकरून रुग्णसेवेत सकारात्मक भर पडेल व जनआरोग्य सुधारेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!