ताज्या घडामोडी

सिंहगडच्या यश चिले ची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

लोणावळा : 5 डिसेंबर  रोजी पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.कॉम.मध्ये शिकत असलेला यश चिले याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर स्पर्धेत विविध महाविद्यालयातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. आंतर विभागीय टेबल टेनिस साठीच्या अंतिम पाच खेळाडू मध्ये प्रवेश करण्यासाठी यश ला ८ प्रतिस्पर्ध्या वर मात करणे शक्य झाल्याने त्याची निवड अंतिम संघात झाली असून महाविद्यालय पातळीवर यश ची निवड महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अनिल कमलापुरे यांनी केली होती.यश चिले याच्या यशाबद्दल लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड व प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!