ममताजींनी तिसरी आघाडी गठीत केल्यास भाजप,आर. पी.आय युतीला फायदा
लोणावळा : ममताजींनी तिसरी आघाडी गठीत केल्यास भाजप,आर. पी.आय युतीला फायदा होईल. त्या पूर्वी एनडीए मधे आसताना रेल्वेमंञी होत्या, नरेंद्रजी मोदीजी २०२४ मधे पुन्हा पंतप्रधान होतील, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदासजी आठवले यांनी पञकार परिषदेत पञकारांना प्रश्नाला उत्तर देताना सांगितले .

आठवले म्हणाले , राज्यातील महाविकासआघाडी जास्त महिने टिकणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांची फारकत घेऊन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे सत्तेवर आले. त्यांनी आडीच वर्षे झाल्यावर पुन्हा भाजप व आरपीआय बरोबर युती करून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर संधी द्यावी.
राज्यात व देशात कोरोनाच्या मायक्रो विषाणुजन्य रोगाची साथ येण्याची शक्यता गृहीत धरून तमाम भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वानदिनानिमित्त मुंबई ला येवून गर्दी करू नये घरी व आपापल्या परिसरातूनच महामानवाला आभिवादन करावे. राज्यात एस टी महामंडळाच्या संपाबाबत राज्यसरकारने विचारपूर्वक निर्णय घेवून ततोडगा काढावा.संप ताणू देवू नये.आर पी आयचा संपाला पाठिंबा आहे. राज्यात जनतेला दळणवळणाला ञास होत आसून लवकर काहीतरी तोडगा काढावा .
लोणावळ्यात विकास कामे झाली , तशी देहुरोडला होत नाही ? या प्रश्नाचे उत्तर देताना आठवले म्हणाले , तेथे गटातटाचे राजकारण आसल्याने विकास कामे व दिक्षाभूमिचे विकासाच्या कामाला आडथळा येतो. डाॕ.बाबासाहेब १९५४ ला देहूरोडला आले होते. तर १९५६ ला बौध्द धर्माची दिक्षा घेतली आहे. त्यामुळे देहुरोड ला महत्त्व आहे.
यावेळी सर्व पञकारांचे स्वागत आर पी आय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले. यावेळी आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष संजय आडसुळे, सरचिटणीस गणेश गायकवाड , तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आभार लोणावळ्याचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के , महिला आघाडीच्या अध्यक्षा यमुना साळवे , लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष दिलीप दामोदरे आदी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष व आरपीआय चे तालुका उपाध्यक्ष श्री.दामोदरे यांनी आभार मानले .यावेळी दोन कार्यकर्त्यामधे बाचाबाची झाली.पण मारामारी होण्याऐवजी कार्यकर्त्यांनी शांततेत आठवले यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून केले.




