आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य उद्धारासाठी जीवन समर्पित केले – प्राचार्य एम.ए.शेख*

मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात डॉ आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्यान कार्यक्रम

Spread the love

अक्कलकोट :-(प्रतिनिधी राजशेखर पवार ) दि 14- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील स्पृश्य अस्पृश्य भेदभाव, कमालीची विषमता यांना तिलांजली मिळावी म्हणून आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.म्हणूनच जगाच्या इतिहासात त्यांच्या कार्यास उच्च स्थान प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन जेष्ठ इतिहास अभ्यासक प्राचार्य एम.ए.शेख यांनी व्यक्त केले.महर्षि विवेकानंद समाज कल्याण संस्थेच्या मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय सौ सुरेखा कल्याणशेट्टी मध्यमिक व उच्च मध्यमिक विद्यालय नालंदा वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य मल्लकप्पा भरमशेट्टी होते.व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे ,मोतीलाल चव्हाण,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राजेश पवार उपस्थित होते.

प्राचार्य भरमशेट्टी म्हणाले की अस्पृश्यांना मानवतेची वागणूक मिळावी म्हणून डॉ आंबेडकर यांनी प्रस्थापिता विरूद्ध चळवळ उभी केली. त्यामुळे त्यांना सामाजिक हक्क मिळाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेश पवार यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.रूपाली देवरमनी यांनी केले.तर आभार प्रा.डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!