लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने plog-o than रन व सायकल रॅलीचे आयोजन
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमेअंतर्गत सायकल रॅली व plog-o-than रनचे आयोजन 30 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅली व साडेआठ वाजता plog-o-than रन होईल अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.
खुला पुरुष गट (अठरा वर्षापुढील ),खुला महिला गट (अठरा वर्षाच्या पुढे) व मुले, मुली (18 वर्षाखालील) अशा तीन गटात रॅली होणार आहे. सायकल रॅली झाल्यानंतर plog-o-than होऊन चालत चालत शहर स्वच्छ करण्यात येईल.या वेळी covid-19 संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे .जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.




