आपला जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय
अहो बाप्पा, तुतारी वाजवायची असेल तर पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी देण्यात यावी केज मतदार संघातील जनतेची मागणी
भरारी न्युज.. केज. केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून देण्याची जोरदार मागणी केली आहे. साठे साहेबांची एकनिष्ठता, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पडतीच्या काळात देखील प्रामाणिकपणे काम करणं, आणि पक्षाशी कधीही गद्दारी न करणं, हे गुण जनतेच्या मनात ठामपणे बसले आहेत. साठे साहेबांचे योगदान: माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केज तालुक्यातील विकासकामांसाठी सतत संघर्ष केला आहे. पक्षात फूट पडली तरीही कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वातच आपल्या राजकीय जीवनाची दिशा ठेवली. आज, जनतेने त्यांची निष्ठा आणि कार्यप्रणाली ओळखून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. राजकारणात अनेक नवीन चेहरे आले डॉक्टर, इंजिनीयर येतात, पण जनतेला असे वाटते की पाच वर्षांत हे डॉक्टर इंजिनिअर तालुक्यात कुठेच दिसले नाहीत पण बाप्पा. पक्षासाठी आणि जनतेसाठी खंबीरपणे उभा आहे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. मतदारसंघातील जनता स्पष्टपणे सांगते की साठे साहेबांसारख्या निष्ठावंत नेत्याला संधी दिलीच पाहिजे, बजरंग बप्पा सोनवणे येत्या काळामध्ये पक्षासाठी जे कोणी डॉक्टर, इंजिनियर,एकनिष्ठेने काम करतील, त्यांना पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळावी. मात्र सध्याच्या परिस्थितीत साठे साहेबांचा उमेदवारी द्यावी ही जनतेची मागणी निष्ठावंतपणा, आणि पवार साहेबांच्या नेतृत्वातील स्थान बळकट आहे. केज विधानसभा मतदारसंघातील जनतेला ठाम विश्वास आहे की, साठे साहेबच पुन्हा तुतारी वाजवण्यासाठी योग्य उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून त्यांना उमेदवारी मिळाल्यास, केजमधील तुतारी साठे साहेबच वाजवणार, जनतेतून हे स्पष्ट होत आहे. साठे साहेबांवर अन्याय होऊ नये, असे आवाहन केले जात आहे. साठे साहेबांची उमेदवारी हे केज विधानसभेतील जनतेच्या अपेक्षांचं मोठं आव्हान आहे, आणि ही जनतेची मागणी आता पक्षाकडे पोहचली आहे.
