आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीयसंपादकीय
केज विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडी कोणाला देणार उमेदवारी?
भरारी न्युज. उत्तरेश्वर शिंदे. राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची निवड आणि मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चाचपणी करून तगडे उमेदवार निवडले जात आहेत. केज विधानसभा मतदारसंघातही यंदा तगडी लढत पाहायला मिळणार आहे. ‘महायुती’, महाविकास आघाडी, आणि ‘परिवर्तन महाशक्ती’ या तिसऱ्या आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची उमेदवारी ‘महायुती’च्या वतीने जवळजवळ निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. केज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे ही जागा आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने जवळपास 40 संभाव्य उमेदवार निश्चित केले आहेत. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, ही नावे जवळपास अंतिम मानली जात आहेत. केज विधानसभा मतदारसंघासाठी पृथ्वीराज साठे यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी: 1. इस्लामपूर – जयंत पाटील 2. तासगाव कवठे महांकाळ – रोहित पाटील 3. शिराळा – मानसिंग नाईक 4. उत्तर कराड – बाळासाहेब पाटील 5. कोरेगाव – शशिकांत शिंदे 6. फलटण – दीपक चव्हाण 7. माण खटाव – प्रभाकर देशमुख 8. शिरूर – अशोक पवार 9. जुन्नर – सत्यशील शेरकर 10. इंदापूर – हर्षवर्धन पाटील 11. आंबेगाव – देवदत्त निकम 12. वडगाव शेरी – बापू पठारे 13. दौंड – रमेश आप्पा थोरात 14. माळशिरस – उत्तमराव जानकर 15. कर्जत जामखेड – रोहित पवार 16. काटोल – अनिल देशमुख 17. विक्रमगड – सुनील भुसारा 18. घनसावंगी – राजेश टोपे 19. बीड – संदीप क्षीरसागर 20. मुंब्रा – जितेंद्र आव्हाड 21. जिंतूर – विजय भांबळे 22. अहेरी – भाग्यश्री अत्राम 23. सिंदखेड राजा – राजेंद्र शिंगणे 24. उदगीर – सुधाकर भालेराव 25. घाटकोपर पूर्व – राखी जाधव 26. परळी – राजाभाऊ पड 27. लक्ष्मण पवार – गेवराई 28. आष्टी – भीमराव धोंडे 29. केज – पृथ्वीराज साठे 30. माजलगाव – रमेश आडसकर 31. राहुरी – प्राजक्त तनपुरे 32. देवळाली – योगेश घोलप 33. दिंडोरी – गोकुळ झिरवाळ 34. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे 35. जामनेर – गुलाबराव देवकर 36. अकोला – अमित भांगरे 37. पारनेर – राणी लंके 38. खानापूर – सदाशिव पाटील 39. चंदगड – नंदाताई बाभूळकर 40. इचलकरंजी – मदन कारंडे केज मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे, विशेषतः विद्यमान आमदार नमिता मुंदडांच्या विरोधात कोण उतरणार, याची प्रतीक्षा मतदारांना आहे.




