आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीयसंपादकीय
अखेर साठे साहेब ठरले तुतारीवाले! विधानसभा मतदारसंघात घडणार मोठा राजकीय बदल.
भरारी न्युज.. उत्तरेश्वर शिंदे. केज विधानसभा मतदारसंघात सध्या पृथ्वीराज साठे यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे. साठे साहेबांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी तिकीट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांच्याच हाती यावं, अशी जोरदार मागणी सुरू केली आहे. परंतु बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अद्याप कोणाच्या नावाची शिफारस निष्ठावंताची करतील की? दोन महिन्यांमध्ये नेता म्हणून फिरणाऱ्यांची डॉक्टर, इंजिनिअर यांची ? बप्पा आपल्याही सोबत निष्ठावंत म्हणून काम करणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब हेच होते हे देखील लक्षात राहू द्या, साठे साहेबांचं कार्य आणि नेतृत्व हे या भागात चांगलंच प्रभावशाली असल्याने, कार्यकर्ते आता पूर्ण ताकतीने मतदारसंघात कामाला लागले आहेत. जनतेमध्ये यामुळे भ्रम निर्माण झाला आहे की, तुतारीचं तिकीट हे अखेर साठे साहेबांनाच फायनल झालं आहे. या सगळ्यामुळे केज मतदारसंघात एकच चर्चा आहे—तुतारी वाजवण्याचं तिकीट अखेर पृथ्वीराज साठे यांच्याच हाती पडणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. केज विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज साठे यांचे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत. प्रत्येक कार्यकर्ता एकच इच्छा व्यक्त करत आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्यासाठी आमणा आवडता नेता पृथ्वीराज साठेच उमेदवार असावा. साठे साहेबांनी केलेले सामाजिक कार्य आणि जनतेसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दलची निष्ठा अतूट आहे. आता कार्यकर्त्यांना आशा आहे की तुतारीचं तिकीट पृथ्वीराज साठेंनाच मिळेल, जेणेकरून ते मतदारसंघात घराघरांत जाऊन साठे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचार करू शकतील. साठे साहेबांच्या लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रमाणीक इच्छेमुळे मतदारसंघात चांगलीच चर्चा आहे. लोकांना वाटतंय की, पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार केल्यास विजय निश्चित आहे.




