ताज्या घडामोडी

मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला; मी देखील शेतकरी आहे – उपमुख्यमंञी अजितदादा पवार

Spread the love

वडगाव : मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला; मी देखील शेतकरी आहे . माझी जात शेतकरी आहे.मी तीस वर्षाच्या राजकीय काळात सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना कधीच ञास दिला नाही, तसे एखादे उदाहरण दाखवा. विकास काम करताना कुणालाही वा-यावर सोडायचं नाही ही आमची भूमिका आहे, असे राज्याचे उपमुख्यमंञी आजितदादा पवार भाषणात कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना म्हणाले .

उपमुख्यमंञी अजितदादा पवार मावळच्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वडगाव येथे आले असता कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे , आमदार निलेश लंके , खासदार श्रीरंग आप्पा बारणे , मावळचे आमदार सुनिल शेळके , माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे ,माजीमंञी मदन बाफना , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पदाधिकारी गणेश खांडगे , जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर आदिसह तळेगाव , वडगावचे , लोणावळ्याचे पदाधिकारी व आजीमाजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी मावळचे आमदारांनी विनंती केल्यामुळै मास्क काढून भाषण केले. केंद्रावर टीका करताना पवार म्हणाले , देशात महागाई वाढली आहे.पेट्रोल , डिझेल वाढले .यावर केंद्र सरकार निर्णय घ्यायला तयार नाही.नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे .यावर केंद्र सरकार बोलायला तयार नाही.हेच का अच्छे दीन ? दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले  त्यांचेशी बोलायला कुणाला वेळ नाही  अशी बोचरी टीका पवार यांनी केली. ते आरक्षणाबाबत म्हणाले , ज्या समाजाला आरक्षण दिले आहे त्याला धक्का न लागता इतरांना कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचा प्रयत्न राहीन. मावळातील विकास काम करताना जुना व नवीन मुंबई पुणे महामार्गाचे रूंदीकरण करताना मावळातील जमिन घ्यावी लागत आहै.काही सुधारणा,विकास करायचा आणि उद्योग आणायचा म्हटले की जमिनी लागतात.त्यासाठी चारपट रक्कम देवू  तुमच्या पुढच्या पिढ्याकरीता काही करून ठेवता आले पाहिजे.

यावेळी सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांनी भाषणातून इतिहासाला उजाळा दिला. ते म्हणाले मी  आमदार सुनिल शेळके आणि तिसरे निलेश लंके या तिघांना ग्रहण लागले होते .पण आदरणीय उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांनी आमच्यावर विश्वास टाकून तिकीट दिले व आम्ही निवडून आलो. आयुष्यभर ग्रहण होते ते कधीच निघाले नसते. निलेश लंके पक्षप्रवेश करतेवेळी त्यांनी आदरणीय अजितदादा पवार हे असतील तरच पक्षप्रवेश करीन ही भूमिका घेतली. मी फोनवरून बोलणे करून दिल्याने तिढा सुटला .आज ते इमदार आहेत. मी २०१४ मधे पराभूत झालो होतो. पराभूत झालेल्या उमेदवाराला विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी आजितदादा व शरदचद्रजी पवार साहेब यांनी बसवले. निलेश लंके ६४ हजार ,आमदार सुनिलआण्णा शेळके ९४,००० मतांनी ,तर मी ३२ हजार मतांनी निवडून आलो. या तिघांमधे शरदचद्रजी पवार यांनी काय पाहिले माहीत नाही.ईडीची चवही घालवू नये.अजितदादा पवार यांच्या मागे भाजपने ई.डी लावली, सी.बी.आय लावली पण हाती काहीही लागले नाही.ईडीची चव घालवू नका.मराठवाडा येथील शेतमजूर सुध्दा खिशात ईडी ठेवत आसतो असे ते म्हणाले.

मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सर्व विकास कामांची भूमिपूजन कार्यक्रमास वाढदिवसानिमित्त मूहूर्त गाठला.मावळच्या जनतेने दिलेल्या भरघोस मतांनी मी निवडून आलो.त्यांचे सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहू . राज्य सरकारच्या मंञीमंडळाचे आभार मानतो असे ते म्हणाले. हजारो शेतकरी व कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!