ताज्या घडामोडी

25 ऑक्टोबर पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

Spread the love

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून बंद असणारी महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी महाविद्यालयात हजर राहू शकणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्याच्या आरोग्य विभागा सोबत बैठक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्‍टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे असे सामंत म्हणाले.

बुधवारे सिडनेहॅम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या स्थितीत लसीचे दोन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थित रहावे असे आवाहन उदय सामंत यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!