ताज्या घडामोडी

तळेगाव लायन्सक्लबच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

Spread the love

तळेगाव : येथील लायन्स क्लबच्या वतीने तळेगाव स्टेशन भागातील लोकमान्य प्राथमिक शाळेत शिक्षकांशी संवाद साधत तसेच त्यांचा यथोचित सन्मान करत शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

संपूर्ण भारतात राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती (5 सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते.शिक्षक दिनाचे औचित्य साधून तळेगावातील लोकमान्य प्राथमिक शाळेत शिक्षकांशी संवाद साधत शिक्षक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्याध्यापक केशव चिमटे, उपशिक्षिका छाया गाडे, कमल पाटील, ज्योती बुरांडे, सूरेखा घरदाळे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी दीपक बाळसराफ यांनी मी या शाळेत कसा घडलो या संदर्भात आठवणी जाग्या केल्या. तर प्रमुख पाहुणे डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, प्रमुख पाहुणे डॉ. शाळीग्राम भंडारी, कोषाध्यक्ष राजेंद्र झोरे त्याचबरोबर लिओ क्लबचे ऋतूराज आणि गंधाली उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!